Wednesday, January 10, 2018

तो घाव गहिरा पण सुगंधी होता .......





तो घाव गहिरा पण सुगंधी होता .......


पौर्णिमेचा चंद्र वेडा , अंगणी माझ्या आला होता

रातराणी चा सुगंध , आसमंती दरवळला  होता

मदहोष  मामला सारा , हाय स्पर्श तुझा धुंद होता


मिटलेल्या डोळ्यात तिच्या , मुक्या आठवणी होत्या

मोहक स्पर्शात त्याच्या , चिंबओल्या भावना होत्या

उरलेले सारे व्यर्थ होते ...त्याला रजनी ऐसे नाव होते


गुंफलेल्या बाहुपाशात , विळखा अधरांचा होता, 

घायाळ झाले मन  , दंश सखयाने केला होता 

उमजले कुठे मला तो घाव गहिरा पण सुगंधी होता 


तो घाव गहिरा पण सुगंधी होता .......

एक थेंब तुझ्यासाठी
१० जानेवारी  २०१८

नजरे समोरूनी ......




नजरे समोरूनी ......

नजरे समोरूनी तुझ्या, घेऊन एक वळसा
गेली कशी निघोनी तुला न कळता
उमजून आता करणार काय
उडून गेलेल्या  क्षणांना कसे  थांबवणार ...

येतो कंठ भरुनी , त्या आठवणींचा ...
ओघळला थेंब एक अंतरीचा ...
अंतर हे दोघातील लांबलेले
तुझ्या वीना माझे जीवनच थांबलेले.......

एक थेंब तुझ्यासाठी
१० जानेवारी २०१८

Monday, January 8, 2018

रंग डोळ्याचा गहिरा झाला ..........



ती :
ठेवू कुठे लपवूनी तुला,तू असा लपणार नाही,
ठरवीन मनाशी तरी ,ओढ अशी संपणार नाही,
चुगलीखोर डोळे माझे ,चहाडी करतील कधीतरी,
गालावरच्या खळीत,लाजून हसू फुटेल कधीतरी,

सांग मी कोंडू कशी ह्या प्रेमळ अनुभूतीला,
भावनांना असे कोंडणे मला जमणार नाही,
नसलास जरी साजणा आज तू जवळी,
भाव विश्वात माझ्या तुझ्यावीण कोणीच नाही...

तो:
लावून काजळ सांग खुलतो का कधी रंग डोळ्यांचा असा
आला बघ नयनी तो , सांग सखे आता टिपणार कसा?
मिटून घे पापण्या घट्ट, ठेव तसाच बांधून त्याला
मग हलकेच उघड नयन दाखव साऱ्या जगाला
काळ्या काजळाने नाही, ओल्या पापण्यांमुळे
रंग डोळ्याचा गहिरा झाला ..........

एक थेंब तुझ्यासाठी
०८ जानेवारी २०१८

Saturday, November 25, 2017

स्वप्नात पाहिले मी तीला....



स्वप्नात पाहिले मी तीला
पावसात भिजताना …
कटी कमनीवर ओली
नक्षी साकारताना

बहकलेल्या होत्या वाटा
अवघड वळणे होती
थरथरणारी कंपने काही
सूर आगळा छेडीत होती


एक एक थेंब हळू हळू
तनुवरुन ओघळताना
सांगत होते कहाणी
तिच्या भिजण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची


एक थेंब तुझ्यासाठी

Tuesday, November 21, 2017

पहचान भूल गए है .........


उलझी हुईं पतंग तारोंसे छुड़ाना जानते है
मतलब ये नहीं के पतंग उडाना जानते है

उलझनो को सुलझाते , फिजा का लुफ्त भूल गए है
भागते हुए पतंगोंके पिछे, हम यूँही उड़ना भूल गए है

समेटे हुए पतंगोंसे , रंगीन ख्वाबोंको देखना भूल गए है
फिरभी कहते फिरते है सबसे हवा का रुख जान गए है

कभी सोचा है जिंदगी बस, कुछ पतंग , डोर और हवा ही तो  है
जिसे हम आज कल  पहचानना भूल गए है .........


एक थेंब तुझ्यासाठी
२१ नवंबर २०१३ 

Thursday, November 2, 2017

वाटमारी , वाटमारी ..


स्वप्नांत कितीदा आला , बाहुत माझ्या साजणा
लपवू किती सांग ना , अधीर माझ्या भावना
तशात लोचनांची साद , स्पंदने झाली बेफाट
वाटेवर प्रेमाच्या केली मी वाटमारी ...

बावऱ्या  त्या स्पर्शाने काहूर मनी उठला
काळ्याकुट्ट मेघात , पाऊस असा दाटला
बरसण्या मग तो , वाट पाहू लागला
होऊन शलाका  केली मी वाटमारी ...

लपेटले मी चिंब भिजलेल्या देहाला
उरी पेटल्या मशालीची उब उशाला
पेटण्या चंदनी चिता वाट पाहू कशाला
अधरांनी पेटवून आग केली मी वाटमारी ...


एक थेंब तुझ्यासाठी

०२ नोव्हेंबर २०१७

Wednesday, November 1, 2017

गुंफताना बंध रेशमांचे, गुंतले कसे कळेना मला..



जे कधी नव्हते तुझ्या मना, का ऐकू येई ते उगा मला
गुंफताना बंध रेशमांचे,  गुंतले कसे कळेना मला...

तुझ्या हृदयाच्या वाटा शोधताना, मल्हार साथीला असताना
लागली नजर कोणाची कि उमटली रेष ललाटी अभाग्याची
दूर दूर जाता जाता , जवळ जवळ येताना उमगले मला


जे कधी नव्हते तुझ्या मना, का ऐकू येई ते उगा मला
गुंफताना बंध रेशमांचे,  गुंतले कसे कळेना मला...

अबोल लोचनि बरसे मल्हार, थिजलेले अधर अबोल फार
थरथरते स्वप्न वाहते पावसात , निशब्ध दडलेल्या हुंदक्यात
क्षितिजा वर गेला प्रवास स्वप्नांचा , दूर जाणाऱ्या समांतर रेषांचा

जे कधी नव्हते तुझ्या मना, का ऐकू येई ते उगा मला
गुंफताना बंध रेशमांचे,  गुंतले कसे कळेना मला..


एक थेंब तुझ्यासाठी
१ नोव्हेंबर २०१८

Wednesday, October 11, 2017

पिकल्या पानाचा ...



पिकल्या पानाचा ...

भरली कि कळी ,खुडताना जरा असुद्या हळुवारपणा
टोचतील की हो काटे, भीती न वाटे का राया तुमाला
सुगंध घ्यावा भरून उरी , वयात ह्या हा कसला नखरा

लाजून झाले मी चूर , लयी दिसान ह्यो दिसला नूर
पडला पदर , झाली नजरानजर , मनी उठला काहूर
इश्काची अदा , मोहक काया , जाळील मला ह्यो करपूर

हौस तुमची , तुमीच की हो पुरवा ...

पिकल्या पानाचा ...

एक थेंब तुझ्यासाठी
१० ऑक्टोबर २०१७

Tuesday, September 19, 2017

सावन ऋतू आई सजनीया




परतून पुन्हा आला, भिजवण्या मला साजण माझा

असे दिन कि असे रात्र कळेना मला , नभी असा काळोख दाटला
वयाचा ना वाटे मला भरोसा , चुकली का वेळ संशय मनी दाटला
उलटला श्रावण तरी हा थबकलेला, सुटला तोल मग दोष कुणाला

करू काय आता प्रमाद हा झाला , भिजून गेले पुरती प्रेमात त्याच्या
भान नसे माझेच मला , चिंब ओली मी झाले , तरी हा परतोनी आला
बहाण्याने कुठल्या रेंगाळला हरी माझा , कोसळला का असा कळेना मला

अश्विनात म्हणू कशी , सावन ऋतू आई सजनीया

एक थेंब तुझ्यासाठी

१९ सप्टेंबर २०१७

Thursday, September 14, 2017

मकरंद होताना ......


पहिले तुला उमलताना ,लाजून चूर चूर होताना
ओघळणारे थेंब इवले पानावर दवबिंदू होताना
वाऱ्याच्या हलक्या स्पर्शाने कळीचे फुल होताना

बहाण्याने संध्येच्या, तू अधर मिटून घेताना,
का लाजलीस  सखे, तो भुंगा रुंजी घालताना
बावरला बघ किती तो, तुझ्या मिठीत शिरताना

रात्र सारी गेली मिठीत तुझ्या, पहाट होताना
कुशीत तुझ्या पहिले स्वप्न, झुंजूमुंजू होताना,
देवू नकोस आळस आता, मी असा निघताना

जावू नको का मी येथून मनात माझ्या नसताना
होवून भ्रमर येवू का मी, कळीचे फुल होताना
टिपण्या ओठांवरचे दवबिंदू , मकरंद होताना

मकरंद होताना ......

एक थेंब तुझ्यासाठी

Thursday, September 7, 2017

रंग नभाचा





रंग नभाचा

मी रंग नभाचा तू तर सांज सावळी
घेशील का मिठीत मजला
रंगुदे क्षितीजावरी नक्षी आगळी ....

गोड गुलाबी पहाटे, दव बिंदूच्या साथीने
गुंफितो तुला स्वप्नी, नाजूक रेशमी धाग्यांनी ,
सुटेल कसा हा गुंता ? सांग आता साजणी…

तुझ्या पासून सुरु, तुझ्या पर्यंत माझा
भावनांचा मन-मोहक, पिसारा असा
शिंपल्यातील गवसलेला मोती तू जसा

खळखळ वाहणाऱ्या झऱ्याचा नाद तू
अल्लड अवखळ वाऱ्यांची  झुळूक तू
बेभान आठवणींचा , तू एक किनारा

मी रंग नभाचा तू तर सांज सावळी
घेशील का मिठीत मजला
रंगुदे क्षितीजावरी नक्षी आगळी ....


एक थेंब  तुझ्यासाठी
०७ सप्टेंबर २०१४

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...