Thursday, September 7, 2017

रंग नभाचा





रंग नभाचा

मी रंग नभाचा तू तर सांज सावळी
घेशील का मिठीत मजला
रंगुदे क्षितीजावरी नक्षी आगळी ....

गोड गुलाबी पहाटे, दव बिंदूच्या साथीने
गुंफितो तुला स्वप्नी, नाजूक रेशमी धाग्यांनी ,
सुटेल कसा हा गुंता ? सांग आता साजणी…

तुझ्या पासून सुरु, तुझ्या पर्यंत माझा
भावनांचा मन-मोहक, पिसारा असा
शिंपल्यातील गवसलेला मोती तू जसा

खळखळ वाहणाऱ्या झऱ्याचा नाद तू
अल्लड अवखळ वाऱ्यांची  झुळूक तू
बेभान आठवणींचा , तू एक किनारा

मी रंग नभाचा तू तर सांज सावळी
घेशील का मिठीत मजला
रंगुदे क्षितीजावरी नक्षी आगळी ....


एक थेंब  तुझ्यासाठी
०७ सप्टेंबर २०१४

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...