तो घाव गहिरा पण सुगंधी होता .......
पौर्णिमेचा चंद्र वेडा , अंगणी माझ्या आला होता
रातराणी चा सुगंध , आसमंती दरवळला होता
मदहोष मामला सारा , हाय स्पर्श तुझा धुंद होता
मिटलेल्या डोळ्यात तिच्या , मुक्या आठवणी होत्या
मोहक स्पर्शात त्याच्या , चिंबओल्या भावना होत्या
उरलेले सारे व्यर्थ होते ...त्याला रजनी ऐसे नाव होते
गुंफलेल्या बाहुपाशात , विळखा अधरांचा होता,
घायाळ झाले मन , दंश सखयाने केला होता
उमजले कुठे मला तो घाव गहिरा पण सुगंधी होता
तो घाव गहिरा पण सुगंधी होता .......
एक थेंब तुझ्यासाठी
१० जानेवारी २०१८
No comments:
Post a Comment