Thursday, November 28, 2013

कबरीला हि सुगंध असतो .....


घेवून उशाशी मोगरा तू अशी निजलीस का
जाळून आठवणीना तू अशी थिजलिस का

स्वप्नात रंगुनी रातराणी कोमेजलीस का
तरीही जहालेल्या चुकांना माळतेस  का?

उगीच जुन्या जखमांना तू कुरवाळतेस का
रुतून बसलेल्या खुणांना उरात सांभाळतेस का

कबरीवरच्या मातीला सुगंध असतो
बघ तुला पटते का?


एक थेंब तुझ्यासाठी
29 NOV 2013 

Tuesday, November 26, 2013

सांग सये ते देशील का?



मौनात तुझ्या मी अर्थ शोधलेले
ओठांवरती तुझ्या मी कोरलेले
सांग सये ते
बोल काही देशील का ?

हलकेच तेन्ह्वा सापडलेले
वाहताना लोचनी मी टिपलेले
सांग सये  ते
मोती मला देशील का?

धुंध प्रीतीने  मन बावरलेले
गंध होवून तुला बिलगलेले
सांग सये  ते
अत्तर मला देशील का ?

आभाळ सारे कोसळलेले
हलकेच तनुस बिलगलेले
सांग सये ते
थेंब  मला देशील का ?

सांग सये ते देशील का?
सांग सये ते देशील का?

एक थेंब तुझ्यासाठी
२७ नोव्हेंबर २०१३


निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा

रोज रोज का असे श्वासांचा पहारा
रोम रोमातुनी उठे हा नवीन शहारा
कातर वेळीस का हा फुलतो निखारा
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा

थकलो मी उगाळून संयमाचे वेढे
देवून जाहले उसने अवसान काढे
सोडून उसासे मोजले रोजचेच पाढे
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा ….

सुगंधी स्वप्नाची नशा मैफिलीला
गुंतनार्या बटांची साथ सोबतीला
उधळतो मग मोगरा संगतीला
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा ….

एक थेंब तुझ्यासाठी
२७  नोव्हेंबर २०१३ 

Saturday, October 19, 2013

श्वास असा रोखतेस का ???



सुटून गेला हात जरी
तरी नाते कधी संपेल का
सोडून गेली वेळ तरी
आठवण कधी थांबेल का ?
विरून गेली लाट किनारी ,
गूज तिची मिटली का?
येवून गेले किती पावसाळे ,
तृष्णा कधी शमली का ?
मग आजच का अट्टाहास हा,
जाताना धरलास हात का?
गेले बोलून डोळे सारे ,
मग शब्दांची वाट पाहतेस का ?
थांब अजून पळभर सख्या ……म्हणून …
श्वास असा रोखतेस का?……

एक थेंब तुझ्यासाठी
२० ऑक्टोबर  २०१३ 

Thursday, October 17, 2013

भेटेल का ग सजण मला …

भेटेल का ग सजण मला …

पहाट अबोली, स्वप्न लोचनी ,
असे गुंफलेले , सोडले अधर,
नाद हा खुळा ,मग उगी लागला
सांग सये ……
भेटेल का ग सजण मला

ओल्या दिसाची, वाट कोवळी,
अशी कातरलेली, सोडली मिठी
गंध हा देही , मग भासे वेगळा ,
सांग सये ……
भेटेल का ग सजण मला

धुंद रातीला, कुंद प्रीतीचा
असा सुवासिक, सोडला अंबाडा,
बुडू लागला ,बघ प्राण खुळा,
सांग सये ….
भेटेल का ग सजण मला

(एक थेंब तुझ्यासाठी )
१७ ऑक्टोबर २० १ ३

Saturday, January 26, 2013

बोल अबोलीचे....

बोल अबोलीचे....
ना बोलली काही ती , ना  कळले मला काही 
तरीही का वाटे  मज , रुणझुणले काही मनी माझ्या 
ना  उमगले मला बोल अबोलीचे..
तरी का आवडे मज बोल अबोलीचे .
जे कधी ती बोललीच नाही...

हि कहाणी दोन डोळ्यांची .....
साद घातलेली , कधी आरजवलेली 
नकळत का होइना ..हळुवार पणे  उलगडलेली 
तरी का आवडे मज कहाणी अबोलीची 
जे कधी तिने सांगितलेलीच नाही ...

एक थेंब तुझ्यासाठी 
२७/०१/२०१३


Saturday, November 17, 2012

ती पाऊलवाट मी पहिली......


चालताना जशी पाऊलवाट अलगद  नागमोडी वळली 
एक एक कहाणी दोघांमधली तितकीच अलगद फुलली 
आजही आहेत नागमोड्या वाटेवरती त्या खाणा खुणा 
शोधताना त्या अनामिक हूर हूर मनी आशीच दाटली 
काय म्हणून सांगू त्या खाणा खुणा ....
तो नाजूक स्पर्शाचा प्राजक्त ,
कधी तो बहकलेला  मोगरा,
कधी तो नखरेल हिरवा चाफा,
तर कधी ती  हळुवार जाई ची फुंकर,
तर कधी त्या  अल्लड जुई ची साद,
तर कधी झालेला गुलाब आरक्त,
तर कधी माळलेली अबोली,
काही कधी ती रुसलेली सायली..
गेलास तू निघून आणि ...........................
आठवणींची ओंजळ माझी नकळत तिथेच  सांडली 

सरताना संध्याकाळ...
आजही त्याच वाटेवरती ,आशीच एक कहाणी मी पहिली 
लाजलेल्या  सायलीला , चाफ्याने घातलेली गळ मी पहिली 
हळुवार फुलणारी , नागमोड्या वळणाने जाणारी 
ती पाऊलवाट मी पहिली......

एक थेंब तुझ्यासाठी 

Saturday, February 4, 2012

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

बिछान्यावरचे ते मोकळे कुंतल पाहून..
पहाटेच्या प्राजक्ताने मनमोकळे बहरावे..
कधी तंग काचोळी मधले यौवन पाहून
सांजेच्या मोगर्याने मदना सारखे फुलावे
माळून गजरा अशा फुलांचा, धरता मी हात तुझा

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

सावरताना तव मोकळे कुंतल मज भान हरपावे
सोसाट्याच्या वार्याला ही मम श्वासांनी लाजवावे
वेणीतुनी ओघळलेल्या फुलांना तनु गंधाने मोहरावे
कंचुकीच्या गाठीला तेवढे स्मरण वेळेचे का रहावे ?

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे

गुंतलेल्या अधरानां कोणी आणि कसे सोडवावे ?
गुंफलेल्या श्वासांना का म्हणून मोकळे करावे ?
मिसळलेल्या देहांना का कोणी वेगळे करावे ?
भान कुठले त्या रात्रीला मग कशाचे राहावे ?

पाहता हे सारे चंद्र ढगा आडून पुन्हा पुन्हा पळतो ...
होवून सूर्य हाच तो सकाळ पासून दिवस भर जळतो ????

एक थेंब तुझ्यासाठी .....
०४/०२/२०१२




Thursday, January 12, 2012

सांगा मी कोणाची....

सांगा मी कोणाची....

लोचनांना माझ्या फुलावी रंग तुझा काळा, 

अधरांना माझ्या खुलवी रंग त्याचा निराळा.

नेहमीच तो येतो......

घाईत जातो पुसुनी रंग अधरांचा पुन्हा पुन्हा,

थांबतोस मात्र तू 

संगे अश्रूंच्या नेत्रात माझ्या पुन्हा पुन्हा ...

रंग गुलाबी त्याचा करतो मादक मम अधरांना

रंग काळा तुझा करतो बोलका मम लोचनांना ..

बेहोष होतो मग तो 

जवळ येण्यास मिळतो बहाणा त्याला पुन्हा पुन्हा 

लपतोस मात्र तू 

जाणून भावना मनीच्या येतोस दाटून पुन्हा पुन्हा

रंगात त्याच्या मी मिसळून जाते सदा न कदा

तरी तो जातो उडून पुन्हा पुन्हा ..
.
रंगात मात्र तुझ्या मी हरवते पुन्हा पुन्हा

तू लुप्त होतोस माझ्यात पुन्हा पुन्हा ...

सांगा मला मी कोणाची ?

ओठांवर रंगणाऱ्या गुलाबी रंगांची

की डोळ्यातल्या काळ्या काजळाची ..
.
सांगा ना मी कोणाची.... मी कोणाची

एक थेंब तुझ्यासाठी

Saturday, December 10, 2011

मलमली तारुण्य माझे ........


मलमली तारुण्य माझे ........

मलमली तारुण्य माझे , तू पहाटे पांघरावे..
होवून प्रेमाची दुलई, मी तुला असे लपवावे 
बोचर्या थंडीला ही मी असे थांबवावे ...

मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे 
सुटू नये हा रेशमी गुंता हेच मी सदा पहावे 
कुंतल मोकळे असे प्रेमहार व्हावे ...

कापर्या माझ्या तनुची तार झंकारून जावी,
तनुची माझ्या अशी संगीत साधना व्हावी 
तव स्पर्शाने  मम कायेची कविता व्हावी ..

रे तुला बाहूत माझ्या, रूपगंधा जाग यावी,
रूप गंधीत रात्र सारी, राया अशीच सरावी,
एक पायरी प्रेमाची अशीच चुकावी 

एक थेंब तुझ्यासाठी ..
१० डिसेंबर २०११ 


Tuesday, December 6, 2011

रोज रोज मी तुला .......


रोज रोज मी तुला .......

रोज रोज मी तुला आसवांत ढाळतो;
माझ्या पापणीत चंद्र असाच विरघळतो 

रोज रोज मी तुला मनात असा जाळतो;
माझ्या सावलीत ही सूर्य असाच होरपळतो 

रोज रोज मी तुला जाणीवेतुनी बोचतो;
माझ्या मनात काटा गुलाबाचा असाच ठुसतो 

रोज रोज मी तुला जखमेतुनी विणतो;
माझ्या ऊरात धागा रेशमाचा असाच थिजतो 

रोज रोज मी तुला वेदनेतून पिळतो 
रोज रोज माझ्या काव्यातुनी मी तुला असाच मिळतो 
माझ्या काव्यातुनी मी तुला असाच मिळतो 

एक थेंब तुझ्यासाठी 
०६ डिसेंबर २०११ 

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...