रोज रोज मी तुला .......
रोज रोज मी तुला आसवांत ढाळतो;
माझ्या पापणीत चंद्र असाच विरघळतो
रोज रोज मी तुला मनात असा जाळतो;
माझ्या सावलीत ही सूर्य असाच होरपळतो
रोज रोज मी तुला जाणीवेतुनी बोचतो;
माझ्या मनात काटा गुलाबाचा असाच ठुसतो
रोज रोज मी तुला जखमेतुनी विणतो;
माझ्या ऊरात धागा रेशमाचा असाच थिजतो
रोज रोज मी तुला वेदनेतून पिळतो
रोज रोज माझ्या काव्यातुनी मी तुला असाच मिळतो
माझ्या काव्यातुनी मी तुला असाच मिळतो
एक थेंब तुझ्यासाठी
०६ डिसेंबर २०११
No comments:
Post a Comment