बोल अबोलीचे....
ना बोलली काही ती , ना कळले मला काही
तरीही का वाटे मज , रुणझुणले काही मनी माझ्या
ना उमगले मला बोल अबोलीचे..
तरी का आवडे मज बोल अबोलीचे .
जे कधी ती बोललीच नाही...
हि कहाणी दोन डोळ्यांची .....
साद घातलेली , कधी आरजवलेली
नकळत का होइना ..हळुवार पणे उलगडलेली
तरी का आवडे मज कहाणी अबोलीची
जे कधी तिने सांगितलेलीच नाही ...
एक थेंब तुझ्यासाठी
२७/०१/२०१३
No comments:
Post a Comment