मलमली तारुण्य माझे ........
होवून प्रेमाची दुलई, मी तुला असे लपवावे
बोचर्या थंडीला ही मी असे थांबवावे ...
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
सुटू नये हा रेशमी गुंता हेच मी सदा पहावे
कुंतल मोकळे असे प्रेमहार व्हावे ...
कापर्या माझ्या तनुची तार झंकारून जावी,
तनुची माझ्या अशी संगीत साधना व्हावी
तव स्पर्शाने मम कायेची कविता व्हावी ..
रे तुला बाहूत माझ्या, रूपगंधा जाग यावी,
रूप गंधीत रात्र सारी, राया अशीच सरावी,
एक पायरी प्रेमाची अशीच चुकावी
एक थेंब तुझ्यासाठी ..
१० डिसेंबर २०११
No comments:
Post a Comment