Saturday, February 4, 2012

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

बिछान्यावरचे ते मोकळे कुंतल पाहून..
पहाटेच्या प्राजक्ताने मनमोकळे बहरावे..
कधी तंग काचोळी मधले यौवन पाहून
सांजेच्या मोगर्याने मदना सारखे फुलावे
माळून गजरा अशा फुलांचा, धरता मी हात तुझा

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे ...

सावरताना तव मोकळे कुंतल मज भान हरपावे
सोसाट्याच्या वार्याला ही मम श्वासांनी लाजवावे
वेणीतुनी ओघळलेल्या फुलांना तनु गंधाने मोहरावे
कंचुकीच्या गाठीला तेवढे स्मरण वेळेचे का रहावे ?

पाहून हे सारे, चंद्रानेही ढगा आड लपावे

गुंतलेल्या अधरानां कोणी आणि कसे सोडवावे ?
गुंफलेल्या श्वासांना का म्हणून मोकळे करावे ?
मिसळलेल्या देहांना का कोणी वेगळे करावे ?
भान कुठले त्या रात्रीला मग कशाचे राहावे ?

पाहता हे सारे चंद्र ढगा आडून पुन्हा पुन्हा पळतो ...
होवून सूर्य हाच तो सकाळ पासून दिवस भर जळतो ????

एक थेंब तुझ्यासाठी .....
०४/०२/२०१२




Thursday, January 12, 2012

सांगा मी कोणाची....

सांगा मी कोणाची....

लोचनांना माझ्या फुलावी रंग तुझा काळा, 

अधरांना माझ्या खुलवी रंग त्याचा निराळा.

नेहमीच तो येतो......

घाईत जातो पुसुनी रंग अधरांचा पुन्हा पुन्हा,

थांबतोस मात्र तू 

संगे अश्रूंच्या नेत्रात माझ्या पुन्हा पुन्हा ...

रंग गुलाबी त्याचा करतो मादक मम अधरांना

रंग काळा तुझा करतो बोलका मम लोचनांना ..

बेहोष होतो मग तो 

जवळ येण्यास मिळतो बहाणा त्याला पुन्हा पुन्हा 

लपतोस मात्र तू 

जाणून भावना मनीच्या येतोस दाटून पुन्हा पुन्हा

रंगात त्याच्या मी मिसळून जाते सदा न कदा

तरी तो जातो उडून पुन्हा पुन्हा ..
.
रंगात मात्र तुझ्या मी हरवते पुन्हा पुन्हा

तू लुप्त होतोस माझ्यात पुन्हा पुन्हा ...

सांगा मला मी कोणाची ?

ओठांवर रंगणाऱ्या गुलाबी रंगांची

की डोळ्यातल्या काळ्या काजळाची ..
.
सांगा ना मी कोणाची.... मी कोणाची

एक थेंब तुझ्यासाठी

Saturday, December 10, 2011

मलमली तारुण्य माझे ........


मलमली तारुण्य माझे ........

मलमली तारुण्य माझे , तू पहाटे पांघरावे..
होवून प्रेमाची दुलई, मी तुला असे लपवावे 
बोचर्या थंडीला ही मी असे थांबवावे ...

मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे 
सुटू नये हा रेशमी गुंता हेच मी सदा पहावे 
कुंतल मोकळे असे प्रेमहार व्हावे ...

कापर्या माझ्या तनुची तार झंकारून जावी,
तनुची माझ्या अशी संगीत साधना व्हावी 
तव स्पर्शाने  मम कायेची कविता व्हावी ..

रे तुला बाहूत माझ्या, रूपगंधा जाग यावी,
रूप गंधीत रात्र सारी, राया अशीच सरावी,
एक पायरी प्रेमाची अशीच चुकावी 

एक थेंब तुझ्यासाठी ..
१० डिसेंबर २०११ 


Tuesday, December 6, 2011

रोज रोज मी तुला .......


रोज रोज मी तुला .......

रोज रोज मी तुला आसवांत ढाळतो;
माझ्या पापणीत चंद्र असाच विरघळतो 

रोज रोज मी तुला मनात असा जाळतो;
माझ्या सावलीत ही सूर्य असाच होरपळतो 

रोज रोज मी तुला जाणीवेतुनी बोचतो;
माझ्या मनात काटा गुलाबाचा असाच ठुसतो 

रोज रोज मी तुला जखमेतुनी विणतो;
माझ्या ऊरात धागा रेशमाचा असाच थिजतो 

रोज रोज मी तुला वेदनेतून पिळतो 
रोज रोज माझ्या काव्यातुनी मी तुला असाच मिळतो 
माझ्या काव्यातुनी मी तुला असाच मिळतो 

एक थेंब तुझ्यासाठी 
०६ डिसेंबर २०११ 

Monday, October 17, 2011

त्याने दिलेल्या फुलांचे काय झाले ?


त्याने दिलेल्या फुलांचे काय झाले ?

मी दिलेल्या फुलांचे काय झाले ? मी दिलेल्या स्वप्नांचे काय झाले?
गंधात फुलांच्या जगलीस तू , सोबतीला स्वप्नात रंगलीस तू.

गंधात फुलांच्या नाहून झाले , रंगात स्वपनांच्या रंगून झाले, 
डोहात प्रेमाच्या डुंबून झाले, तुझे एक आयुष्य एक जागून झाले,

आठवते तीज कोठे आता, रंगली नव्या स्वप्नात ती आता,
फुलांचे का आयुष्य असते, स्वप्नांचे का कोठे गाव असते,

तीचे आता सारे काम झाले, जे पाहिजे ते सहज साध्य झाले,
कोणाची फुले ती?  कोणाची स्वप्ने ती? कोणास ठावूक काय झाले,

नसेल ठावूक तीला पण, तरीही सांगतो तुम्हाला,
स्वप्नातल्या फुलांचे आता निर्माल्य झाले ...

एक थेंब तुझ्यासाठी 
१७ ऑक्टोबर २०११
सेउल - साउथ कोरिया 

Tuesday, August 30, 2011

गजरयाची पुस्तकातील कबर



गजरयाची पुस्तकातील कबर 

वेणीत तुझ्या माळून मी गुंतून गेलो, 
गंध माझा तुला देवून मी फुलून गेलो 
गंधाने माझ्या मोहरून, धुंध झालीस तू, 
जवळ घेता सख्याने किती लाजलीस तू,

सख्याने तुझ्या मग डाव असा साधला,
हुंगुनी मला त्याने पदर तुझा खेचला,
जे न पहिले डोळ्यांनी ते मी अनुभवत होतो,
धुंध होती रात्र ती मी एकटाच साक्षीदार होतो 

विझले मग दिवे सारे, शब्द मग अबोल झाले,
सारे प्रणय श्वास, गंधाने माझ्या ओले चिंब झाले,
बिछान्यावर मग मात्र, तोडून त्याने मला  विखुरले 
तशीच सरली रात्र सारी, भान मग ना कोणा उरले,

तुझ्या जागे होण्याची वाट ते डोळे बघत होते,
रात्रीपासून ते कलेवर निपचित खाली पडले होते 
हलकेच त्या कलेवरातून दोन फुले तू उचललीस,
त्या रात्रीची आठवण म्हणून आयुष्य भर जपलीस 

आज त्या सुकलेल्या फुलांनी डोळे का ग पाणावले,
असून सख्या जवळी तुझ्या मन का ग हेलावले,
बघ वेणीत तुझ्या माळून मी जीव असा संपवला, 
गजरा गजरा म्हणत, जीव तुझ्या साठी सुकवला,

आता उरली आहेत दोन फुले तुझ्या कुठल्यश्या पुस्तकात
काय माहित? निपचित पडून तेथे काय सांगू पाहतात?
कबरीलाही सुगंध असतो हे ठावूक नसते कोणास...
हे ठावूक नसते कोणास....

एक थेंब तुझ्यासाठी 
३० ऑगस्ट २०११






Monday, August 15, 2011

आल्या तुझ्या आठवणी ....

आल्या तुझ्या आठवणी ....


पारिजातकाचा सडा पडला माझ्या अंगणी,

काय म्हणू त्याला, तुझ्या येण्याची चाहूल की,

जागे करण्या पहाटे आल्या तुझ्या आठवणी..


मोगरा बघ कसा फुलला माझ्या अंगणी,

काय म्हणू त्याला, तुझ्या येण्याची चाहूल की,

सजवण्या सांज आल्या तुझ्या आठवणी...


रातराणी बघ कशी बहरली माझ्या अंगणी,

काय बाई म्हणू हीला, तुझ्या येण्याची चाहूल की,

खुलवण्या रात्र आल्या तुझ्या आठवणी...


तो वेडा चंद्र एकटा आला माझ्या अंगणी,

काय म्हणू बाई ह्याला, तुझ्या येण्याची चाहूल की,

जागवायला रात्र सारी घेवून चांदणे आल्या तुझ्या आठवणी....


एक थेंब तुझ्यासाठी

१५ ऑगस्ट २०११



Wednesday, July 27, 2011

आत्मा सुटतो कधी......


आत्मा सुटतो कधी......

पिंजून फुलांना, ती एक एक पाकळी टाकते कशास?
उमजले तरी सारे, ती घेते नशिबाचा कौल कशास,

आरशात का कधी,  तिने स्वतःला पहिले आहे?
लुटवून सारे काही,  तिचे असें काय रहिले आहे

फसवून स्वतःला, होता येते का मोकळे कधी?
जाळून देहाला , ऐकले का आत्मा सुटतो कधी...

एक थेंब तुझ्यासाठी 
२८ जुलै २०११

दोष प्रियेचा....


दोष प्रियेचा....

नको ग असें पाहू, हवेत असें कटाक्ष कशाला 
भेटीत पहिल्या असें जखडू नये सख्याला 

बांध की घट्ट अंबाडा, आवर कि हा कुंतल हार 
पौर्णिमेच्या रात्री हि बघ कसा मजवरी दाटे अंधार,

घे ना ग आवरून अधरांना, सोडा की हि मिठी खास  
बघ पहिल्याच चुंबनात सुटला माझा शेवटचा श्वास,

देती दोष प्रियेला सारे, असा काय खेळ झाला,
अहो पहिल्याच चुंबनात प्राण माझा मोकळा झाला, 

एक थेंब तुझ्यासाठी 
२८ जुलै २०११  

Thursday, July 21, 2011

मगच तू ओघळणार ..मगच तू येणार


मगच तू ओघळणार  ..मगच तू येणार 

अरे कुठे लपला होतास, असा अचानक कसा आलास,
जाशील पण असाच निघून, न सांगता, न कळवता ,
आठवणीतला पाऊस, असाच बरसतो मधून मधून...

खोडच तुला अचानक येतोस , वेळी अवेळी नेहमी गाठतोस 
का नको तेन्ह्वा बेभान होतोस, नेहमीच अशी धिटाई करतोस,
आठवणीतला पाऊस, असाच कोसळतो मधून मधून...

आल्यावर आता मागशील किती, ओशाळू तरी मी दरवेळा किती,
बंधने तरी आता तोडू मी किती, लाज तरी बाई मी सोडू किती 
आठवणीतला पाऊस, असाच लाजवतो मधून मधून... 

जाशील आता तसाच निघून, बघशील का एकदा मागे वळून 
झाली का रावांची स्वारी तृप्त , कि  चाललास तसाच रुसून,
आठवणीतला पाऊस, असाच रुसतो मधून मधून...

स्वारीचे येणे  पुन्हा कधी व्हायचे, वाट बघत मी किती बसायचे,
कित्ती म्हणून डोळ्यात साठवायचे,किती म्हणून मी तरसायचे 
आठवणीतला पाऊस, असाच झुरवतो मधून मधून ..

माहित आहे मला तू असा नाही येणार ...
आठवणींची सुई  टोचुन मगच तू कोसळणार 
मगच तू ओघळणार ...मगच तू येणार .....

एक थेंब तुझ्यासाठी 
२२ जुलै २०११

तुझ्या बरोबर पावसात ......

तुझ्या बरोबर पावसात ......

धुंध पावसात तुझ्या अंग अंगाला खेटायला आवडेल...
त्या पावसाच्या थेंबानी अंग तुझे भिजवायला आवडेल...
भिजताना  तुझ्या सोबत, तुला सांभाळायला आवडेल...
पाऊस कोसळताना तुझ्या खांद्यावर टेकायला आवडेल...
चिंब चिंब पावसात तुझ्या साथीने मला भिजायला आवडेल...
पावसाळी गारठ्यात तुझ्या हातांच्या उबेत राहायला आवडेल..
पावसाचे थेंब अंगावर झेलून , तुझ्यावर ओघळायला आवडेल...

पण मेला पाऊस ...नेहमी नेहमी पडत नाही... मला संधीच तशी देत नाही..
प्रार्थना करते देवाला, निदान वर्षातून तीन महिने तरी पाड पावसाला.
तिला राहूदेत घरी,  मला त्याच्या बरोबर नेहमीच जायला आवडेल...
जळूदेत कितीही तिला , मला टुक टुक करून तिला चिडवायला आवडेल..

चिंब पावसात तुझ्या बरोबर राहायला आवडेल...
वेड्या पावसात वेड्या सारखे संगे तुझ्या भिजायला आवडेल 
एवढे नशीब मला सोडून , कोणाला मिळते तेच पाहायला आवडेल 

अरे वेड्या, मला तुझी छत्री व्हायला आवडेल...

एक थेंब तुझ्यासाठी 
२१- जुलै २०११






मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...