आल्या तुझ्या आठवणी ....
पारिजातकाचा सडा पडला माझ्या अंगणी,
काय म्हणू त्याला, तुझ्या येण्याची चाहूल की,
जागे करण्या पहाटे आल्या तुझ्या आठवणी..
मोगरा बघ कसा फुलला माझ्या अंगणी,
काय म्हणू त्याला, तुझ्या येण्याची चाहूल की,
सजवण्या सांज आल्या तुझ्या आठवणी...
रातराणी बघ कशी बहरली माझ्या अंगणी,
काय बाई म्हणू हीला, तुझ्या येण्याची चाहूल की,
खुलवण्या रात्र आल्या तुझ्या आठवणी...
तो वेडा चंद्र एकटा आला माझ्या अंगणी,
काय म्हणू बाई ह्याला, तुझ्या येण्याची चाहूल की,
जागवायला रात्र सारी घेवून चांदणे आल्या तुझ्या आठवणी....
एक थेंब तुझ्यासाठी
१५ ऑगस्ट २०११
No comments:
Post a Comment