मगच तू ओघळणार ..मगच तू येणार
जाशील पण असाच निघून, न सांगता, न कळवता ,
आठवणीतला पाऊस, असाच बरसतो मधून मधून...
खोडच तुला अचानक येतोस , वेळी अवेळी नेहमी गाठतोस
का नको तेन्ह्वा बेभान होतोस, नेहमीच अशी धिटाई करतोस,
आठवणीतला पाऊस, असाच कोसळतो मधून मधून...
आल्यावर आता मागशील किती, ओशाळू तरी मी दरवेळा किती,
बंधने तरी आता तोडू मी किती, लाज तरी बाई मी सोडू किती
आठवणीतला पाऊस, असाच लाजवतो मधून मधून...
जाशील आता तसाच निघून, बघशील का एकदा मागे वळून
झाली का रावांची स्वारी तृप्त , कि चाललास तसाच रुसून,
आठवणीतला पाऊस, असाच रुसतो मधून मधून...
स्वारीचे येणे पुन्हा कधी व्हायचे, वाट बघत मी किती बसायचे,
कित्ती म्हणून डोळ्यात साठवायचे,किती म्हणून मी तरसायचे
आठवणीतला पाऊस, असाच झुरवतो मधून मधून ..
माहित आहे मला तू असा नाही येणार ...
आठवणींची सुई टोचुन मगच तू कोसळणार
मगच तू ओघळणार ...मगच तू येणार .....
एक थेंब तुझ्यासाठी
२२ जुलै २०११
No comments:
Post a Comment