Tuesday, August 30, 2011

गजरयाची पुस्तकातील कबर



गजरयाची पुस्तकातील कबर 

वेणीत तुझ्या माळून मी गुंतून गेलो, 
गंध माझा तुला देवून मी फुलून गेलो 
गंधाने माझ्या मोहरून, धुंध झालीस तू, 
जवळ घेता सख्याने किती लाजलीस तू,

सख्याने तुझ्या मग डाव असा साधला,
हुंगुनी मला त्याने पदर तुझा खेचला,
जे न पहिले डोळ्यांनी ते मी अनुभवत होतो,
धुंध होती रात्र ती मी एकटाच साक्षीदार होतो 

विझले मग दिवे सारे, शब्द मग अबोल झाले,
सारे प्रणय श्वास, गंधाने माझ्या ओले चिंब झाले,
बिछान्यावर मग मात्र, तोडून त्याने मला  विखुरले 
तशीच सरली रात्र सारी, भान मग ना कोणा उरले,

तुझ्या जागे होण्याची वाट ते डोळे बघत होते,
रात्रीपासून ते कलेवर निपचित खाली पडले होते 
हलकेच त्या कलेवरातून दोन फुले तू उचललीस,
त्या रात्रीची आठवण म्हणून आयुष्य भर जपलीस 

आज त्या सुकलेल्या फुलांनी डोळे का ग पाणावले,
असून सख्या जवळी तुझ्या मन का ग हेलावले,
बघ वेणीत तुझ्या माळून मी जीव असा संपवला, 
गजरा गजरा म्हणत, जीव तुझ्या साठी सुकवला,

आता उरली आहेत दोन फुले तुझ्या कुठल्यश्या पुस्तकात
काय माहित? निपचित पडून तेथे काय सांगू पाहतात?
कबरीलाही सुगंध असतो हे ठावूक नसते कोणास...
हे ठावूक नसते कोणास....

एक थेंब तुझ्यासाठी 
३० ऑगस्ट २०११






No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...