Thursday, May 26, 2011

रुबाई


रुबाई
रुबाई हा हिंदी मधला एक काव्य प्रकार....आपल्या कडे जशा चारोळ्या प्रसिद्द्ध आहेत तशाच प्रकारचा., चारोळ्या जशा चार ओळींच्या तशीच रुबाई हि चारच ओळींची  फरक इतकाच कि रुबाई मध्ये एक कहाणी असावी जिची सुरुवात पहिल्या शेरा मधून किंवा ओळीतून सुरुकारून शेवटच्या ओळीत संपवायची असते... चार वेगवेगळ्या अर्थाच्या ओळी असू नयेत. जशा चारोळीच्या मध्ये असू शकतात. कहाणीला ओवीत गुंफण्याची हि कला आहे...

माझ्याच हौसेची हि कहाणी आहे , दिसले जे जे त्याला घातली गवसणी आहे,
पाऊल ठेवले तिथे वाट तयार झाली,  स्वप्नांना सार्या सत्यात घेवून आली,
मिळवले सगळे जे काही वाटले ......तरीही हि रुख रुख का उठते मनी
कळतच नाही घालवलेली ती गोष्ट कुठली होती.......

काल तुझी बट अडकली होती माझ्या शर्टाच्या बटनात 
म्हटले झाली हीच तर दोन मनाची मिलनाची सुरुवात
प्रार्थना केली ईश्वराला, ठेव हि गाठ आशीच बांधून 
ठेव कि थोडेसे धागे असेच कायमचे गुंतवून....

मिलते है आप लोगों को नसीब से,

अरमां मेरे दिल में भी है अजीब से,

गुजरना कभी होके मेरी गलियों से,

देखा नहीं कभी चाँद को इतना करीब से,




आजही आहे मी तुझ्यात कुठे ,

छेडूनी तार हृदयाची आईक जरा 

आजही माझ्यात आहे ती , 

डोळ्यात वाकुनी शोध जरा

Thursday, May 19, 2011

चिता त्या ओल्या क्षणांची

.
ती आग, तो दाह, तो गोडवा, त्या ओल्या मिठीचा
झाली आज मला आठवण त्या पहिल्या चुंबनाची..
अधीर मनाला , मिळाली  चिता त्या ओल्या क्षणांची 

पहिल्या चुंबनाची  कहाणी कशी असावी? तर तो उसळलेला दाह अन्गा अंगातून लागलेली ती आग. दोन ओठांची होता भेट ..ते शिरले एक मेकांच्या मिठीत. आठवून हे सारे आज काय वाटते ते लिहिले आहे..

त्या चुंबनाने काय साधले होते ? तर अधीर आणि आसुसलेल्या मनाला कोणीतरी ओल्या ओठांच्या चितेवर ठेवले होते...

चितेवर हा शब्द अशा रोमान्तिक गोष्टीत एवढा बसत नाही...नाही का? अहो पण माणसाला चितेवर ठेवतात कधी ? जेन्ह्वा त्याचे जीवित कार्य पूर्ण होते तेन्ह्वा.

मनाचे हि तसेच आहे बुवा ...पहिल्या चुंबनाने त्याचे कार्य संपले आणि ते कायमचे विलीन झाले तिच्या आयुष्यात ...म्हणून ती चिता....तिच्या प्रेमाची....

एक थेंब तुझ्यासाठी 

ते फक्त फसफसू शकते उसळी नाही मारत...

विकास दर गाठायचा कि वाढत्या महागाईला तोंड द्यायचे याच विवंचनेत बहुतांश भारतीय समाज आता अडकला आहे. मुक्त भांडवलशाही कितीही वाचायला गोड वाटत असली तरी तिची मुळे हि कडूच असतात हे वास्तव आता हळू हळू का होईना आपण लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेत झाले म्हणजे आपल्या कडेही तसेच होवू शकते एवढा भाबडा आशावाद बाळगून आपण जोमाने वाटचाल करत आहोत.
परंतु मुळात अमेरिका हा देशाच उपऱ्यांचा...आणि स्वतहाची अशी काही ओळख नसलेल्या एका कळपाचा आहे. त्यात निरनिराळ्या पद्धतीची लोके आहेत. पण त्यांची एक म्हणावी अशी  कुठलीच संस्कृती नाही. जे मिळेल ते घेत गेले जे नको ते टाकून दिले अशा काहीशा विचारसरणीवर वाढलेली सारी जमात आहे. भांडवलशाही तिथे यशस्वी झाली, पण म्हणून हा नियम प्रत्येक समाजाला लागू होईल असे नाही...
विकास दराचे टोक गाठताना ..महागाईची झळ आज बसू लागली आहे आणि इथेच खरी गोम आहे.  कोण म्हणेल कि बरोबरच आहे थोडे चटके सोसल्या शिवाय चांगले दिवस कसे दिसणार? अर्थात बहीण बाईंचे विचार इथे लागू होत नाहीत कि...आधी हाताला चटके तवा मिळते भाकर....

किंबहुना आधी विकासाचे मटके त्यात महागाईचे निखारे फार अशीच काहीशी अवस्था आहे. जागोजागी उभे राहिलेले मॉल आणि लागलेच्या छानचोकीच्या सवयी...त्यात स्वतःहून बदलून घेतलेली  जीवन शैली. ह्या सगळ्यात महागाईचे चटके सोसायचे म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार असेच झाले आहे...

सरकार काही करत नाही...अशी बोंब सगळेच मारतात (अहो इकडे अमेरिकेत सुद्धा ) पण सरकारने करावे काय असे राहिले आहे हातात? 
जे जे म्हणून आपण आपले उभे केले होते ते सगळे , भांडवलशाहीच्या नादाला लागून आपण विकून बसलो किंवा विकत आहोत. माझी आजी म्हणत असे..अरे जेन्ह्वा घराचे सोने विकून तू श्रीमंत होशील तेन्ह्वा सगळ्यात दरिद्री तूच आहेस असे समज.  
रोज रोज पेपरातून येणाऱ्या सरकारी विनिवेशाच्या जाहिराती पाहून आणि त्या वरील तज्ञांचे विचार वाचून खरच विषाद वाटतो.  सरकारचे काम वस्तू बनवणे नाही तर वस्तू बनवायला उत्तेजन देणे आहे..म्हणून आम्ही सरकारी उपक्रमांचे हळू हळू खाजगीकरण करत आहोत..जेणे करून त्यात एक व्यावसायिकता यावी आणि जास्तीतजास्त फायदा मिळावा.

मग हेच विनिवेशातून पुढे आलेले भांडवलदार कशी लयलूट करतात आणि जागतिक मंदीचे कारण ठरतात हे आपण आताच येवून गेलेय मंदीतून पहिले आहे. या वेळेची मंदी सर्वार्थाने  वेगळीच ठरली..विकासाची मडके हातात घेवून उभे असलेल्या भारताला (चुकलो इंडियाला) त्या मडक्यात काय काय असू शकेल ह्याची एक झलक दाखवून दिली. ज्या अमेरिकेचे भांडवलशाही धोरण आज आपण स्वीकारले आहे , किंबहुना अंगिकारले आहे. अशा अमेरिकेतच हे भांडवलदार सरकारकडे तिथल्या जनतेच्या घामातून जमवलेल्या पैशांच्या जीवावर आपले घाणेरडे कपडे धूत होते. अर्थात त्याला भांडवलशाहीने खूप चांगले नाव दिले होते..बेल आउट प्याकेज. स्वाती पैसे कोणाचे गेले तिथल्य सामान्य जनतेचे फक्त सरकारी तिजोरीतून गेले एवढेच. 
दूर तिकडे युरोपात सुद्धा हाच फाजील पणा चालू आहे , युरो च्या नावाने एकत्र आलेल्या भांडवली ठेकेदारांना आता समस्या जाणवते आहे ती , मी तुझी धुणी का धुवावी ह्याची. एकीकडे ग्रीस , पोर्तुगाल ह्या सगळ्या तथाकथित भांडवलदारांच्या हातातील व्यवस्था आता अक्षरशः घायाळ झाल्या आहेत. समस्या तीच आहे ...महागाई 

मग आजच हे सगळे लिहिण्याचे उपयोजन काय? कारण इतकेच...कि आजूनही इंडिया मध्ये भारत वेगळाच आहे. ज्या देशात मुलभूत परिस्थिती अशी कि जिथे उपासमारीने आजही शेतकरी मारत आहेत त्याच देशात विकास २ अंकी होतो म्हणून सगळे मोठ्ठ्या खुशीत आहेत.

काहीतरी चुकले आहे....दोष भांडवलशाहीचा नाही..आपलाच आहे. पोट दुखत असताना ..डोके दुखायची गोळी घेवून कसे चालेल??? वेदना शमन जरी दोन्ही गोळ्यातला समान धागा असलातरी त्यांचे कार्य वेगवेगळ्या भागावर चालते हेच आपण विसरलो आहोत. मी इथे कम्युनिझम चा प्रचार किंवा भांडवलशाहीचा विरोध करत नाहीये.

सांगण्याचा अर्थ एवढाच आहे कि ज्या वेळेला जगाला मोठ्या आर्थिक मंदीने पूर्वी ग्रासले होते तेन्ह्वा (औद्योगिक मंदी जी आपण शाळेत शिकलो होतो बहुधा) केंन्स नावाचा कोणी अर्थ शास्त्रज्ञ होवून गेला ज्याने लिहिलेल्या अर्थविषयक प्रबंधामुळे जगाला त्या औद्योगिक मंदीतून बाहेर यायची वाट सापडली म्हणे....त्या वाटेलाच आजची भांडवलशाही असे म्हणतात...

पण एक सांगू का....त्या वाटेवरही खच खळगे आहेतच कि...आणि सध्याचा खड्डा ज्यात तुम्ही आम्ही सगळेच उभे आहोत ...तो इतका मोत्ठ्ठा झाला आहे ना कि...त्यातून बाहेर कसे पडावे तेच सुचत नाहीये...

बघुयात पुढचा केंन्स कोण जन्माला घालतो ते....

सध्यातरी कोकाकोला प्यायची वेळ झाली आहे....त्या मुळे थांबतो.....एवढे मात्र नक्की कि तो केंन्स का कोणी इन्दिअत जन्माला येणार नाही....कारण आमच्या रक्तात आता कोकाकोला वाहते ...ते फक्त 
फसफसू शकते उसळी नाही मारत...

एक थेंब तुझ्यासाठी 




पोतेरे.....

पोतेरे.....

सहज म्हणून का होईना, तिचे पाय लागले  पोतेऱ्याला
त्या दिवसा पासून उपरण्याचा साज चढला साल्याला  ...

त्या दिवसा पासून काही औरच घडले, शालुचे असले म्हणून काय, 
पोतेरे सगळी कडे मिरवू लागले, इथे तिथे दिसू लागले 

पोतेरेच ते जाता येता प्रत्येक जण त्याला तुडवू लागले,
एक दिवस पाय पुसून, पायी तुडवून चिंध्या झाल्या.

एक एक धागा दुखाचा त्याला आता दिसू लागला
तिने मात्र एकाच केले, पोतेरेच ते ...एक भिरकावून  दुसरे केले..

पुन्हा एकदा आईकले आहे.....नवीन  पोतेरेही तिच्या पायाची प्रतीक्षा करत
उपरणे होण्याची वाट बघत प्रत्येक दिवस मोजत आहे...

एक थेंब तुझ्यासाठी - महेश उकिडवे 

Wednesday, May 18, 2011

दृष्टीकोन बदला सगळे जगच तुम्हाला वेगळे भासू लागेल


ती तशी नेहमीच दमून भागून घरी येते.. घर संसार, मुले बाळे, त्यांचे शिक्षण, नवरोजी (म्हणजे मी हो) चे मन जपणे, सासू सासरे, नातेवाईक सगळ्यांना पुरून उरते... कधी म्हणून कंटाळा दिसत नाही तिच्या चेहऱ्यावर. कधी  कधी थोडीशी चिडते, पण शेवटी माझाच संसार आहे म्हणून गप्प बसून सगळे सहन करते. तिची नोकरीही तशी चांगली आणि उत्तम संधी असलेली. बिच्चारी उन्नतीचा विचार न करताच संसारासाठी झटत असते. प्रमोशन घेतल तर घराकडे, मुलांकडे लक्ष देता येणार नाही. धन्य  आहे बाबा तिची...माझे तसे नाही...मी अजूनही तसाच  २ पोरांचा बाप होवून पण तो तसाच कौलेज मध्ये होतो तसाच...जराही गांभीर्य नाही कि जगण्याचा दृष्टीकोन अजून सापडलेला नाही. आला दिवस मस्त मजेत धमाल करण्यात घालवायचा. 
तिला प्रपोज करून  लग्न केले त्याला सुद्धा आता बरीच वर्षे झालीत. ती मात्र हळू हळू का होईना  पण बरीच बदलली आहे. आता त्या कॉलेज कुमारीची काकू झाली आहे. दरवेळेस आपले संसार घर,  हेच तिच्या डोक्यात असते. मला नाही हो जमत असले भातुकली खेळ ! चायला मस्त आठवडा भर काम करावे, आठवड्याचा शेवट गोड करावा.... दोन घोट घेवून घसा ओला करावा आणि मग मस्त पैकी कोंबडीवर ताव मारावा. पण हिचे आपले चालूच...या रविवारी सत्यनारायणाची पूजा घालुयात या वर्ष भरात झालीच नाहीये.  तर कधी  म्हणे गावी एक चक्कर मारून येवूयात,  का तर मजा करायला नाही, तर म्हणे तिकडे थोडे काम बाकी आहे, घराकडे पण लक्ष देणे जरुरी आहे. तर कधी म्हणे छोट्याची परीक्षा आहे तर कधी मोठीचे प्रोजेक्ट आहेत.  या सगळ्या राम रगाड्यात माझी पण दृष्टी कुठेतरी हरवत चालली आहे. पूर्वी केवढा रोमांटीक का काय म्हणायचे तसा होतो मी. हल्ली आठवडे कसे जातात ते कळत नाही. रोमान्स कसला डोम्बल करणार. खरा सांगू का सुचतच नाही हल्ली काही. संध्याकाळी घरी जाताना फुले घेवून जावू म्हटले तर वाटते जावूदेत चायला सकाळ पासून उन्हात उभे राहून ती फुले पण कंटाळली असतील कुठे त्यांना आता कामाला लावा. काही गिफ्ट घेवून जावे म्हटले तर खर सांगू का सगळे आहे घरी, काय देवू तेच तेच पुन्हा असे वाटते. मुळात काय ना ह्या डोंबिवली च्या  एकसुरी आयुष्याने अगदी विचका केलाय. सकाळी लवकर उठा पाणी भरा, धडपडत ती गाडी गाठा, संध्याकाळी घरी आले कि अगदी राम राज्यात आल्या सारखे वाटते. राम राज्य मला वाटते फक्त डोंबिवली मधेच अनुभवायला मिळेल...संध्याकाळचे दिवे गेलेले सगळे लोक अगदी नेहमीच्या सवयी प्रमाणे मेणबत्या किंवा  मिण मिण  दिवे लावून काम करणारे. चायला हॉटेल मध्ये जावून कॅन्डेल लाइट डिनर घ्यायचे देखील सुख आमच्या कडून हिरावून घेतले आहे. आमचा आपला आठवड्यातून ४ दिवस ठरलेला कॅन्डेल लाइट डिनर असतो.    एवढ्या सगळ्या गदारोळात ती रोमांटीक दृष्टीच कुठेतरी हरवून बसल्या सारखे झाले...

तो दिवस तसा नेहमी प्रमाणेच उजाडला, सकाळी सकाळी मी अंघोळ करून ऑफिस ला जायच्या तयारीत आवरू लागलो. सवयी प्रमाणे स्वयंपाक घरात डबा घेण्यासाठी गेलो...आमच्या डोंबिवली मध्ये ना साला ए सी लावला असला तरी घामाच्या धारा वाहात असतात. डोंबिवलीच्या हवेची मजाच काही और आहे. असो......तर काय सांगत होतो...

हि आपली घाम घूम होवून पोळ्या लाटत होती, नख शिखांत घामाने डब डबलेली, मी तिला पहिले आणि आणि आणि....वेडाच झालो...म्हटले टू केवढी सुंदर दिसतेस ...ती जरा खेकसूनच म्हणाली वेळ काळ नाहीये का ...वाजले किती बघा...आज जरा उठायला उशीर झाला तर डब्याला पण थोडा उशीरच होतोय.  देते एक मिनिटात घ्या आणि निघा गाडी जाईल नाहीतर.

माझ्या मनात मात्र भलतेच...मी म्हटले अग पहा जरा स्वतः कडे, केस जरी विस्कटले असले तरी पोळीचे पीठ त्या बटेला लागून काय सुंदर दिसत आहे....  तुझ्या मानेवरून ओघळणारे ते घामाचे थेंब , तुला हळू हळू भिजवत आहेत...तुझ्या देहाची पोळ्या करताना होणारी मनमोहक हालचालच मला आज वेडे करून जात आहे..आईकून ती हबकलीच जागच्या जागी..... मोठ्ठा  आ वासून बघत उभी राहिली  .......मी हातातली ब्रीफकेस  फेकली जमिनीवर आणि तिला तशीच जवळ ओढली....काय मस्त सीन होता सांगू...ती अशी घामाने भिजलेली , मी असा कडक इस्त्रीतल्या कपड्यातला, तिच्या एका हातात लाटणे तर माझ्या एक हातात तिचे मानेवरचे केस.....त्या चिंब चिंब घामाने भिजलेल्या तिच्या मानेवरून मी माझे ओठ फिरवले आणि ते घामाचे थेंब टिपून घेतले........

कधीकाळी कोलेजात असताना एका छताखाली उभे राहायचो पावसाळ्यात, तेन्ह्वा तुझ्या अंगावर उडालेले थेंब असेच मी टिपून घेत असे....आठवते का काही मी म्हणालो.

आजचे थेंब मात्र वेगळेच होते....घामाचे थेंब.....थोडे नाही चांगलेच खारट....ती पटकन म्हणाली सोडा ना काय करताय....घाम कसला टिपताय ..काहीतरीच तुमचे...... घाणेरडे कुठले काही वाटत  नाही का....मी तिला लगच म्हणालो अग ह्या घामाच्या थेंब मधला आणि त्या पावसाच्या थेंब मधला फरक सांगू का तुला ?ते प्रेम अधीर होते आजचे प्रेम मुरलेले आहे इतक्या वर्षाच्या संसाराने ते कमी नाही झाले उलटे वाढलेलेच आहे... त्यावेळी पावसाच्य पाण्याला तुझ्या देहावरून टिपून घेताना ते गोड वाटायचे ... आता ह्या मे महिन्याच्यादिवसात सुद्द्धा तुझ्या अंगावरून ओघळणार्या घामाच्या थेंबाची चव काही न्यारीच आहे.....थोडीशी खारट पण हवी हवीशी आहे.

म्हणूनच तर आपले गुलझार साहेब म्हणतात ना....

जुबान पे लागा लागा रे नमक इश्क का  हाय रे नमक इश्क का....तेरे इश्क का 

आता कुठे कळले आम्हाला गुलझार साहेबांचे इश्क़ वाले नामक काही वेगळेच आहे....प्रत्येकाने ते एकदा तरी आजमावून बघावे असेच आहे. नाहीतर आम्ही आपले ह्या गाण्य वर सदर झालेल्या नृत्य वरूनच त्याची परीक्षा केली होती...

काय लिहिले आहे अश्लील गुलझार साहेबांनी असे वाटले होते....आणि त्यात ती बिपाशा नाचली होती...सगळाच आपला डोळ्यांनी बघू नये आणि कानांनी आईकू नये असा प्रकार वाटायचा .

पण खर सांगू का आमच्या घरातल्या त्या छोट्याश्या सीन नंतर मला मनोमन पटले गुलझार साहेब काय म्हणतात ते . बघण्याचा  दृष्टीकोन बदला सगळे जगच तुम्हाला वेगळे भासू लागेल असे कुठेतरी वाचले होते.

गुलझार साहेब धन्यवाद ....आमच्या छोट्याश्या संसार मधल्या ह्या हलक्याफुलक्या प्रेमाला सुद्धा तुम्ही किती उंचीवर नेवून ठेवलेत...

एक थेंब तुझ्यासाठी - महेश उकिडवे


 


हल्ली माझ्या शर्टाला खिसाच नसतो.......


ते दिवसच काही और होते, कित्ती वेळा त्याच त्याच रस्त्याने जायचे,त्याच त्याच खिडकीत बघत बसायचे.वाटायचे कधीतरी दर्शन होईल. कधीतरी तो एक कटाक्ष मलापण मिळेल. त्या वेड्या आशेवर जगण्यात अर्धे काय अहो जवळ जवळ पूर्ण महाविद्यालयीन वय निघून गेले. आठवणीच त्या कधीतरी उफाळून येणारच, मग आल्या कि अशा काही येतील कि बरसून जावा पाऊस, अगदी हवा हवासा वाटताना. नकळत मग मन हळू हळू मागे जाते...ते दिवस त्या गमती जमती आठवल्या कि कसे का कोणास ठावूक थोडे ओले होते. मग त्या ओल्या मनाची स्पंदने तीही हळूहळू ओलीच भासू लागतात , अलगद पणे एक एक करत ती सुरेल झंकार छेडीत जातात. बघा आठवते आहे का ती चोरटी नजरा नजर, बघायचे असून देखील न बघण्या सारखे करायची धडपड. त्या चोरट्या नजरेतच साली जाम मजा होती. काय कळणार ह्या वेड्यांना जे ढोसत बसतात हल्ली कि नशा त्या दिवसातली काही न्यारीच होती. ती धडपड तिच्या आधी जावून तिच्या गल्लीत उभे रहायची....चायला कित्ती लेक्चर्स त्या पायी अर्धी टाकून पळालो आहे कोणास ठावूक? ती आलीच नाही किंवा दिसलीच नाही कि मग वाटायचे मास्तर बरा शिकवत होता उगाच पळालो. पण ती दिसली कि वाटायचे आयला हि अशीच दिसत राहणार असेल ना तर जन्म भर ह्या लेक्चर्स ना बसणार नाही. मग काय ती तिच्या सोसायटी मध्ये शिरे पर्यंत आमची तिथेच समाधी लागायची. वाटते सांगावे ह्या सगळ्या, बाबा, योगी, तपस्वी आणि कोण कोण काय ते त्यांना कि बघा अशी समाधी लावलीत ना कि मोक्ष सुद्धा अगदी चटकन मिळतो.....कशाला उगाच आपले ते नसते योग प्रकार आणि धार्मिक कामे करा. असो......विषय भरकटून देता कामा नये... मग हळू हळू तिचा आणि माझा धीर चेपू लागला. मला वाटू लागले कि तिला बहुतेक माझे उभे राहणे आवडत असावे. तिला वाटत असेल बरा उभा आहे रोज रोज, कोणी आले गेले ना गल्लीत कि त्यालाच पत्ता विचारतात (ह हा हा ). लाल शर्ट घातला कि अगदी पोस्टाची पेटी वाटतो. हळू हळू चेपणार्या धीराची जागा आता, एका अनामिक ओढीने घेतली होती. का कोणास ठावूक पण ती दिसली नाही किंवा तिला तो कधी दिसला नाही तर काहीतरी चूक चुकल्या सारखे वाटू लागले होते. हळू हळू वर्षे सरत होती...धीर चेपला होता तरी विचारण्याचा धीर कोणासच झाला नव्हता. नाही होत हो असा धीर. आ धीर व्हायला मी काय कोणी अमिताभ कि दिलीप कुमार? मग काय  तेच तेच उभे राहणे आणि तसेच आपले काळाने पुढे जाणे चालूच राहिले.

यथावकाश मोठ्ठा का काय म्हणतात ते झालो. मोठ्या गाढवाला बहुतेक समंजस किंवा माय्चुअर  का काय म्हणत असावेत...भल्या मोठ्या पगाराची नोकरी....कोरी करकरीत गाडी....ह्म्म्म गाड्या.. सारी भौतिक सुखे पायाशी लोळण घेवू लागली....

बर्याच  दिवसांनी जन्मगावी / आता शहर म्हणतात त्याला आलो होतो. ते सुद्धा सोडून आता कित्ती वर्षे झाली होती. सगळे काही नवीन  आणि वेगळे वाटणारे.तसे म्हणायला कोणी ओळखीचे दिसलेच नाही.
बायको बरोबर गाडीतून जात असताना आरेच्या ती गल्ली दोघानाही एकदम ओळखीची वाटली....आरे इथे काहीतरी राहून गेले आहे असे वाटले...

मी हळूच तिला म्हटले ...

तुम्हारी गली की उन मस्त मस्त नज़रों ने चुराया होगा....

मुझे यक़ीन है कि तुम्ही ने उन्हें बताया होगा....

उस दिन से मेरे कुर्तेसे  बायीं जेब गायब है....

क्या पता कहीं जेब से दिलही  ग़ायब है.....


खरच सांगतो अहो बघा वाटले तर, हल्ली माझ्या शर्टाला खिसाच  नसतो.......




महेश उकिडवे

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...