पोतेरे.....
सहज म्हणून का होईना, तिचे पाय लागले पोतेऱ्याला
त्या दिवसा पासून उपरण्याचा साज चढला साल्याला ...
त्या दिवसा पासून काही औरच घडले, शालुचे असले म्हणून काय,
पोतेरे सगळी कडे मिरवू लागले, इथे तिथे दिसू लागले
पोतेरेच ते जाता येता प्रत्येक जण त्याला तुडवू लागले,
एक दिवस पाय पुसून, पायी तुडवून चिंध्या झाल्या.
एक एक धागा दुखाचा त्याला आता दिसू लागला
तिने मात्र एकाच केले, पोतेरेच ते ...एक भिरकावून दुसरे केले..
पुन्हा एकदा आईकले आहे.....नवीन पोतेरेही तिच्या पायाची प्रतीक्षा करत
उपरणे होण्याची वाट बघत प्रत्येक दिवस मोजत आहे...
एक थेंब तुझ्यासाठी - महेश उकिडवे
No comments:
Post a Comment