Thursday, November 17, 2016

५०० आणि १००० च्या नोटांचे -डीमॉनेटायझेशन ... शिव्यांची लाखोली आणि वास्तव




५०० आणि १००० च्या नोटांचे -डीमॉनेटायझेशन ... शिव्यांची लाखोली आणि वास्तव

मागील आठवड्या पासून सध्याच्या सरकारने डीमॉनेटायझेशन चा निर्णय घेतला आणि त्याला नाण्याची एक दुसरी बाजू म्हणून  , मी माझ्या फेसबुक आणि व्हाट्सअँप  माध्यमातून हे सगळे कसे नाटकी आहे ते मांडायचा प्रयत्न केला. अर्थात अपेक्षित प्रतिसाद मिळाला .. शिव्यांची लाखोली , अक्कल काढणे , बुद्धीची किंव करणे , अत्यंत घाणेरड्या शब्दात निर्भत्सना ... आणि अगदी वयक्तिक दोषारोप , चरित्र हल्ला आणि भडीमार ....    परंतु एकालाही  हे धड सांगता आले नाही कि हा निर्णय का घेतला , कशासाठी घेतला  आणि कोणत्या परिस्थिती मध्ये घेतला , मुळात हि भानगड काय आहे हेच मुळात कोणाला माहित नव्हते आणि केवळ अंधभक्ती म्हणून ह्याचे समर्थन करत होते .

एक म्हण आहे  बोलणाऱ्याचे  शेण सुद्द्धा हातोहात खपते आणि  नाही त्याच्या सोन्याला सुद्धा भाव मिळत नाही ...  याच उक्ती प्रमाणे ह्या संपूर्ण निर्णयाला देशभक्तीचा असा काही मुलामा चढवला गेला कि , त्याच्या विरुद्ध बोलणे  किंवा माफक विरोध करणे सुद्धा   देशद्रोह  ठरू लागला. इथेच खरी मेख आहे.

मुळातच डीमॉनेटायझेशन  चा साधा सोपा अर्थ असा कि सरकार चलनातून ठराविक नोटा काढून घेते. हि  एक अतिशय वास्तववादी अशी प्रक्रिया आहे . मुळातच असा निर्णय हा कधीच देशभक्तीशी नी गडीत नसतो. असलाच तर हा विषय  महागाई, पैशाचे चलन वळण सुधारणे आणि अतिरिक्त पैसे काढून घेऊन चलनाची पत सुधारणे इत्यादी पुरता असतो.  काळा पैसे काढून घेणे ह्याच्याशी तर याचा दुरूनही संबंध येत नाही ...   डीमॉनेटायझेशन  चा संबंध असलाच तर काही अंशी गुन्हेगारी पैशाशी येतो ... काळ्या पैशाशी नाही.  कारण मुळात काळा पैसे हा चलनात असतो हे मानणारे भाबडे फक्त मध्यमवर्गीय असू शकतात.

अगदी उदाहरण द्यायचे झाले तर .. आयुर्वेदाने कर्करोग बरा होतो ... किंवा होमियोपॅथी  मुळे दुर्धर आजार बरे होतात  हे खरे मानून  असल्या आजारांसाठी जगमान्य ऍलोपॅथी ला नाकारणे होय.

मग ह्या सरकारने असे का सांगावे कि हा निर्णय काळ्या पैशाला थांबवण्यासाठी घेतला आहे ?  त्याची मुळात दोन करणे असू शकतात .. एक राजकीय आणि दुसरे अगतिकता.  चलनाच्या मागे घेण्याने   जो काळा पैसा बाहेर येतो त्याचे प्रमाण एकूण काळ्या पैशाच्या प्रमाणात अगदी नगण्य असा असतो .. काळा पैसे हा मुळात सोने, स्थावर मालमत्ता ,  बेनामी मालमत्ता , परदेशातील मालमत्ता  आणि वेगवेगळ्या व्यवसायात बेमालूम पणे घुसलेला असतो. अगदी सोपी उदाहरण म्हणजे ... एखादा कलाकार बाजार मूल्य पेक्षा कितीतरी वरच्या दराने जागा घेतो निर्मात्या कडून ... त्याला त्याच्या कलाकारी बद्दल मिळालेला मोबदला असतो. तो हीच जागा काही दिवसांनी भाव येत नाही म्हणून परत दुसऱ्या निर्मात्याला अथवा त्याचे लागे बांधे असलेल्या व्यक्तीला विकून  नुकसान दाखवतो . तेवढाच वैध पैशातल्या मोबदल्यावर कर भरायला लागू नये म्हणून.  वरील सगळा  व्यवहार कायदेशीर झाला आणि तरीही त्यातून काळा पैसा  निर्माण झाला. आता मला सांगा ह्यात चलन आलेच कुठे ?  निर्माता, कलाकार ह्यांनी कोणीच कुठेही कुठलेच चलन वापरले नाही .. वापरला तो पैसा सगळा चेक किंवा कार्ड स्वरूपात होता. आता अशा धेंडांना या निर्णयाचा फटका बसेल का?  कदाचित बसेल पण तो अगदीच नाममात्र.
आता वळूयात हा निर्णय मुळात का घेतात ह्या विषया कडे ... हा निर्णय मुळात घेतला जातो तो एक तात्कालिक परिणाम म्हणून. म्हणजे बघा .. तुम्ही डॉक्टर कडे गेलात  आणि सांगितलेत की तुमचे डोके दुखत आहे ... निदान होण्या आधी कोणताही डॉक्टर तुम्हाला वेदनाशामक गोळ्यांचं देईल ... निदान झाले कि मग ज्या योग्य गोळ्या अथवा जे औषध असेल ते मिळेल. पण हेच जर का तुम्हाला कळले कि ह्या केवळ वेदनाशामक गोळ्या आहेत, कदाचित तुम्ही त्या घ्यायला नकार द्याल .. आणि योग्य गोळ्यांची मागणी कराल ... वैद्यबुवा ते लगेच देऊ शकणार नाहीत. पण मग जर वैद्यबुवांनी सांगितले कि ह्या गोळ्या घेतल्या नाहीत तर जीवन मरणाचा प्रश्न उद्भवेल .... ताबडतोब ह्या गोळ्या घ्याल ... हो कि नाही ?    वरील उदाहरणावरून  एक गोष्ट लक्षात येईल ती इतकीच कि  डीमॉनेटायझेशन हा एक तात्पुरता केलेला इलाज असतो ... त्याने रोग बरा होत नाही. 
डीमॉनेटायझेशन हे आता पर्यंत काही निवडक देशांनी केलेली प्रक्रिया आहे , त्याचे ढोबळ कारण म्हणजे  अर्थशास्त्रात देखील ह्याला तितकीशी मान्यता नाही .. हा निर्णय का घेतात याचे  आणखीन एक कारण म्हणजे  लोकांनी जास्तीतजास्त  न दिसणाऱ्या पैशाचा वापर करावा म्हणून.     पण हा निर्णय घायकुतीला येऊन घेण्याचा नाही.

मुळात भारतात अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर चलनात व्यवहार करण्याची पद्धती आहे कारण पत संस्था , बँक आणि इतर माध्यमे आजून पुरेशा प्रमाणत  चलनवलन सुलभ करून देत नाहीत ...  पैशाचे चलन वळण अजूनही क्लिष्ट असेच आहे. त्याला कारण इथल्या आर्थिक संस्थांचे व्यवहार आणि त्यांची धोक्यात असलेली विश्वासहर्ता.  असे जवळपास एकही दशक गेले नाही जिथे मोठा आर्थिक घोटाळा झाला नाही. आणि म्हणूनच अजूनही सामान्य माणूस प्रत्येक्षात चलन वापरायला बघत असतो. अगदी सोप्पे उदाहरण म्हणजे ... माझे कै. वडील , आर्थिक संस्थेशी संबंधित असूनही  क्रेडिट कार्ड वापरणे त्यांना कधी पटले नाही , उधारी घेऊन कोणतेही काम करण्या पेक्षा ... रोखीने केलेलं बरे , एवढा साधा विचार त्या मागे.  मुळात ती पिढी आता कमी अधिक प्रमाणात उरली नाही पण त्यांनी दिलेले संस्कार अजूनही तसेच आहेत ... त्याचमुळे कि काय दारावरचा दूध वाला सुद्धा एकवेळ फुकट दूध देईल पण पैसे चेक किंवा कार्डावर घेणार नाही. तो रोखीतच घेतो . आता तो काळा पैसे आहे का ? मुळातच नाही .. उद्या त्याने हा पैसे दाखवला नाही तर काळा होईल ... पण म्हणून रोखीने केलेला वयवहार अयोग्य ठरत नाही.  ज्या प्रकाराने  ह्या सरकारने डीमॉनेटायझेशन केले त्याने ह्या सामान्य माणसावर अविश्वास दाखवला.   त्याला सरळ सरळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.  फक्त एवढाच शहाणपणा केला तो म्हणजे त्याने आरडाओरड करू नये म्हणून    त्याला देशभक्तीचा मुलामा दिला. आणि आपला निर्णय अंगलट आलाच तर त्यातून तरुन  जायची राजकीय सोय केली.

आता वळूयात कि ह्यांनी असे का केले .. आणि नक्की काय चुकले ह्या विषयाकडे ....

मुळातच हा निर्णय  रिझर्व्ह बँकेने घ्यायला हवा होता , परंतु आर्थिक विषयाची अगदी योग्य जाण असणाऱ्या रघुराम ह्यांना बहुधा हि वरवरची मलमपट्टी मेनी नसावी म्हणौन त्यांनी तो घ्यायचा टाळला असावा .. इथूनच ह्यांचा  सध्याच्या प्रधानसेवकाशी  खटका उडाला असणार ... सगळ्या बँकांना बुडीत कर्ज काढून टाकायला सांगणारा असा हा धडाडीचा रघुराम होता.  सरकारला हि गोष्ट नको होती कारण आजून बऱ्याच धेंडांची सोया लावायची होती.  मग काय त्याला काढून टाकल्यावर .. नवीन आलेल्या अधिकाऱ्याला हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेच गेले नाही असे माझे ठाम मत आहे. अन्यथा  आता पर्यंत देशातील बँकिंग (कर्जे नाही ) रिझर्व्ह बँकेने उत्तम पाने वसवले आहे आणि कसोशीने आणि बऱ्याच सचोटीने त्याची वीण घट्ट बांधली आहे.
परंतु अहं ब्रम्हास्मि ची लागण एकदा झाली कि  रावण सारखा अतिशय मोठा आणि पराक्रमी योद्धा सुद्धा रसातळाला जाऊ शकतो हेच खरे.

ह्याची राजकीय पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे ...

साधारण ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ आपल्या शेतीवर आधारलेल्या व्यवस्थे करिता अतिशय बहुमूल्य असा काळ असतो.  खरीप पिके हाताशी आलेली असतात आणि रब्बी पिकांच्यासाठी शेतकऱ्याची आणि त्यावर आधारभूत मोठ्या घटकांची लगबग सुरु असते. फार मोठ्या प्रमाणावर चलनाचा पुरवठा ह्या दिवसात होत असतो. ह्याच दिवसांच्या आजूबाजूला अनेक सण वार येत असतात ... एकूण हा काळ खऱ्या अर्थाने सुगीचा असतो ..... अशा काळात असला निर्णय घेणे हे कोठल्या विद्वानाच्या डोक्यात येईल?  त्याचे सरळ सरळ कारण हेच कि  असा निर्णय घेताना त्याची जी तजवीज करायला हवी ती करण्यासाठी ना बँका तयार होतील ना अर्थव्यवस्था.   गेला काही काळ सर्जिकल स्ट्राईक चा मुद्दा फार गाजत आहे.  त्या अनुषंगाने  माणेकशॉ  ह्यांचा एक किस्सा पुन्हा पुन्हा चर्चेत येत राहिला तो म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने बांगलादेश युद्धाची तयारी केली आणि इंदिराजींना अगदी सडेतोड पणे पण संयत शब्दात सांगितले कि तुम्ही माझा सल्ला धुडकावून युद्ध केलेत तर माझा राजीनामा तयार असेल ...  परंतु इंदारीजी ( त्यांचं  विषयी इतर काही मते असू शकतात) ह्या अतिशय सारासार विचारकरणाऱ्या होत्या ... त्यांनी आपल्या हात खालच्या अधिकाऱ्याचे नुसते ऐकलेच नाही तर त्यांना पूर्ण मुभा दिली आणि मग निर्णय घेतला.  थोड्कॅट सगळी अक्कल  स्वतःला आहे आणि बाकी सगळे मंत्रिमंडळ .. अधिकारी हे निव्वळ होयबा आहेत अशी समजूत करून घेतलेल्या प्रधानसेवकाला   असा सल्ला कोणी दिलेला चालला नसेल. अन्यथा उर्जित पटेल ह्यांना देखील हा निर्णय किती पटला असेल ते , तेच बापुडे जाणोत.


फक्त मी माझा आणि माझा अहंकार   ह्यातच सगळे राजकीय आयुष्य घालवलेल्या प्रधानसेवकाला ... ह्या निर्णयाची जबाबदारी तर नको होती पण मिळालेला राजकीय फायदा जरूर हवा होता ... तेच इप्सित होते.  आता मुळात हा राजकीय फायदा का हवा होता ..  व्हायचे सरळ आणि ढोबळ उत्तर हेच आहे कि गेल्या २ वर्षात ह्या सरकारने भरीव घोषणा  जरूर दिल्या पण भरीव कामगिरी काहीच केली नाही. आतंरराष्ट्रीय बाजारात म्हणावी तर पत जराही सुधारलेली नाही. ज्या प्रमाणे ह्यांनी देशोदेशी भराऱ्या मारल्या .. त्या वरून जे काही नवीन करार मदार झाले त्याचा भारतापेक्षा  व्यापारी देशांना जास्त फायदा झाला हे कोणीच नाकारणार नाही. ह्यांच्या सरकार विरोधात वाढत चाललेला असंतोष आणि हळूहळू लोकांना ह्यांचा फोल पणा लक्षात येत होता. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्दयांवर हे सरकार सत्तेवर आले ( विकासाच्या नाही) ...  मुळात हे सरकार काँग्रेसला झालेले नकारात्मक मतदान ह्यामुळे निवडून आले आहे हि वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. असो, एक एका मंत्र्यांची मुक्ताफळे आणि घायकुतीला येऊन निर्णय घेणे एवढेच चालू होते. बरोब्बर ६ महिने आधी काही उद्योगपतींनी सरकारला खडे बोल सुनावले होते  हे विसरून चालणार नाही.  अशसगळ्या परिस्थिती मध्ये अत्यंत दुर्दैवी असा हल्ला सैन्य दलावर झाला उरले सुरले मनोबल आता तुटते कि काय असा प्रश्न निर्माण झाला आणि सरकारने लाज राखण्याकरिता  सर्जिकल स्ट्राईक केला. त्याला मिळालेला देशांतर्गत भाबडा आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहता .. जनता मागील सगळे विसरली ,,, आणि ह्यांना एक नवीन मुद्दा मिळाला.  मग असाच सर्जिकल स्ट्राईक हा शब्द वापरून आपण काळ्या पैशाला आला घालुयात नव्हे तशी बतावणी करूयात असा  विचार ह्यांच्या मनात आला असणार ....    अन्यथा गेले १० महिने पासून चालू असलेला हा विचार इतक्या अयोग्य वेळेला घेतलाच गेला नसता.  आणूं मुळात गेले दहा महिने हा सगळं प्रकार चालू होता मग हे सगाले नीट पार पडावे व्हायची दक्षता का घेतली गेली नाही ?  आजून एक मुद्दा ... गेले दहा महिने ह्यावर तयारी आणि विचार चालू होता मग सरकारने काळा पैसे उघड करायची मुदत सप्टेंबर पर्यंत का ठेवली होती ?  कोणी कोणी ह्या स्कीम मध्ये आपला काळा पैसा पुढे आणला ह्याची नवे तरी ह्या साधनशुचिर्भूत सरकारने उघड करावीत. त्यांनी किती काळ्याचे पांढरे केले ते आम्ही विचारत नाही ... पण देशाला कळू तरी देत कोणी कोणी ह्यात आपली पोळी भाजून घेतली

वरकरणी जरी हे सगळे साधे वाटत असले तरी ह्यातच सगळी गोम आहे   ह्याच स्कीम मध्ये जो संदेश द्यायचा तो ह्यांनी आपल्या आप्त स्वकीयांना दिला होता कि काय अशी शंका घेतली तर त्यात वावगे काय ....

शेवटी काय अहंकार माणसाला मारतो ह्यावर एक खूप सुंदर विचार आहे ...

एका भक्ताने प्रभू रामचंद्रला विचारले  रावण एवढा महापराक्रमी असून सुद्धा तो हरला का?   त्यावर राम म्हणतो रावण को मैने नाही मै ने मारा ...


आजून प्रभू रामचंद्र जन्माला यायचे आहेत तो पर्यंत रावणाचा अहंकार वाढत जाईल      हेच  बाकी खरे ...




















Wednesday, November 9, 2016

आवर की स्वतःला जरा




आवर की स्वतःला जरा

थरथरणारे ओठ तुझे, वर बटा करती धिंगाणा
टपोरे ते भरलेले डोळे, पदरात तुझ्या नाचतो वारा
सांग मग कसा न बरसेल तो पाऊस खुळा

दरवळतो मादक सुगंध श्वासातुनी तुझ्या
हाय कितीदा नेले त्यांनीच  समीप तुझ्या
रोमरोमातील मोगरा, जाळतो मला पुन्हा पुन्हा

भूर भूरणाऱ्या बटांना सांग वारा कसा आवरेल ?
खट्याळ भावनांना सांग चेहरा कसा लपवेल ?
वर म्हणते ती कशी मला, आवर की स्वतःला जरा

आवर की स्वतःला जरा

एक थेंब तुझ्यासाठी
१० नोव्हेंबर २०११

Tuesday, October 18, 2016

अधून मधून सुचलेले

प्रीये  तू जानेना  मो मन को , बिन बोले सब बोले 

देख/ परख मोरी आंखिया , और जान मो मन को 




वाऱ्याची झुळूक तुला स्पर्शून येताना , वेगळीच भासे 
उडणाऱ्या  बटांची ती एक झलक, गुलाबी स्वप्न भासे 

गुलाबी हसरी सकाळ सांगे काल रात्रीची कहाणी 
गंधित मोगऱ्याची ,सापडली कलेवरे तुझ्या अंगणी 




कबरीतल्या निजलेल्या मूर्तीला, कुर्निसात मी करून गेलो 
नकळत चुंबिता शब्दांना , माझे मी पण हरवून गेलो …
टेकवूनी माझे ओठ नावावरती तुझ्या …. 
अमृतप्राशन मी करून गेलो…
अंतरीतल्या आत्म्याला सुगंधी करून गेलो




कोणी म्हणे डोळे जणू तलाव निळा शार
तलावात ह्या राहती , तहानलेले फार
डोळ्यात तुझ्या हे काय गुपित साजणी
छेडीता मी तार , उठली झंकार विराणी

काळेकुट्ट आले दाटून, धीर  कुठला  त्यांना 
गरजत गरजत आले थांबवेल कोण ह्यांना 

ओझे पापण्यांचे ठाऊक  नसते कोणा ... 


काळेकुट्ट आले दाटून, धीर  कुठला  त्यांना 
गरजत गरजत आले थांबवेल कोण ह्यांना 

वाहती कोणते ओझे पापण्या ठाऊक नसते कोणा ... 

हरवतो केसात तुझ्या जीव बावरा, 
धुंद ती  तान  छेडतो  पुन्हा  मारवा
चालला बघ सखे तो पाऊस आपला, 
कोणी तरी मला आता सावरा...



आळवता हि बासरी मनाची भेदून सारे सूर गेले,
उठला आक्रोश मनी तरी त्याचे सुरेल गाणे झाले,

स्पंदने मनाची, की कंपने स्वरांची जनात नसते वाद झाले


सावळा रंग, कोमल अंग , कोरली चंद्रकोर भाळी 
गुंतले मन कुंतली ,कोंडली नभाची छटा काळी  
भुरुभुरुणारी बट , गुंजणारे ओठ, स्मित हास्य माळी 
जहाल नजर , इशारा बेफिकीर, बेमौसमी दाटला बहर  
तशातच पावसाची सर ..  

झाला मग कहर कहर कहर 

सावरून जा ना  मोकळ्या बटा , जाताना 
येत दबक्या पावलांनी , केलास खेळ सारा 
सोडवू कसा हा गुंता , सांग आता मनमोहना 




जीवघेणा तो शृंगार , इशारे नयातुनी हजार 
वर  मोहक अदांचा खंजीर , गेला आरपार 
सांग सये , मी सावरू कसे आता वारंवार 
नको लावूस बोल जर सुटला तोल एकवार 



गंध तुझा भरता श्वासात, भाव मनी दाटे असा 
निर्मल तळ्याकाठी वाऱ्याने उठे  तरंग जसा 

नकोस बोलू काही सजणे ,गंधित होऊदे मला 
रोमरोमात मिसळूदे , तुझाच मी होऊन मला 

गोड हासणे , अबोल बोलणे , नजरेत कटाक्ष भारी
संकटात पडलो मी , हि ग्वाही तुझी कि शिक्षा भारी
अबोला तुझा जणू पुस्तकातील कोऱ्या कागदा सारखा
म्हणावे फाडता ही येत नाही ,टाळता हि येत नाही मला
भेटलो किती दिवसांनी , निवांत पणा हि जर गोंधळला
नजरेच्या भाषेने, मूक संवादांनी सारा आसमंत बहरला ,
एक थेंब तुझ्यासाठी
21 May 2016 - Dublin CA


कल भी चाँद आगोश में, आज भी बाहोंमे है मेरा 
कल भी उसीका मंजर था, आज भी उसीका है 
कल भी हम मौजूद थे , आज भी हम मौजूद  है 
फर्क बस इतना था  के 
कल पूनम की रात थी , आज अमावस की है 
आशिक तेरा , रुसवा  तेरा , शायर तेरा , दीवाना तेरा 
25 Dec 2020





पौर्णिमेच्या चांदण्या रात्री, श्रावणातल्या धुंध रात्री
बघा कसा मोगरा वाळून गेला.
जाताना पापण्यांना आसवांची, आठवणीना हुंदक्यांची
तो तोरणे बांधून गेला


मोकळ्या श्वासांतुनी ,  स्वर आगळा आळवू लागल्या 
सये सावरलेल्या बटा , आता कुठे भुरुभुरु लागल्या 
अशीच राहावी साथ संगत , सोबतीला मल्हार असावा 

चिंब भिजलेल्या जीवनाला , अर्थ वेगळा प्राप्त व्हावा 

त्या रात्री सावल्यांना जाग होती , पाकळ्या काही गळाल्या होत्या,
भार ओठांना जाणवला होता, श्वासात मोगरा दरवळला होता,
रेशमी मिठीचा हा अनोखा अंदाज होता



अंगणी माझ्या तुझ्याच आठवणींचा सडा पडला,
वेचताना फुले काही जीव माझा तिथेच रुळला 
उरात भरल्या मी किती मोहक आठवणी तुझ्या 
मिटले डोळे, कोंडला श्वास,अलगद माझा प्राण सुटला 
उमजले नेण्यास मला सखयाने सुगंधी निरोप धाडला..... 


तो बेभान चंद्र असा उफाणलेला , ती रात्रही अशी नशीली
माडांच्या आडून चाललेला तो लपंडाव , आणि ती अशी लाजलेली
कोण म्हणतो रात्र झोपण्यासाठी असते ?


तो: रात्र अशी बहरलेली,रातराणी मोहरलेली
केस मोकळे सोड ना?
ती: त्या चंद्राला एक कळत नाही कसे वागावे
तू तरी समजून घेना जरा ...............

दिले जे वचन तुला मी , तुला न आठवायचे
आठवून तुला मी रोज , रोज ते मोडतो
जगण्यासाठी तुझ्याविना, रोज थोडे खोटे बोलतो

बरसणारा पाऊस, कुंद श्वास . आंस  लोचनांची 
साद घातली अशातच मग , थरथरणाऱ्य ओठानी 
उधाण आलेल्या मनाला , मग सांग कसे सावरू 
थांब ना रे पावसा , मी कसे आवरू ... 





दोन प्रियकर तिचे खेळती लपंडाव तिच्याशी एक दिवसा तर एक रात्री, होते मग तीही कधी भावविभोर होतो त्यांच्याहि मनी काहूर, सोडोनी लाजबंध सारे येती जवळ ते., हीन तुम्ही आम्ही, शापितो प्रेमाला त्यांच्या ग्रहण म्हणून हे


वेड्या मनीची आस , बघते मी आतुरतेने वाट 
का न कळे तुला नेत्री बरसतो मल्हार खुळा 

दवबिंदू टिपावे मी काही , ओल्या केसांतुनी  तुझ्या 
स्वप्ने वेचावी मी काही ,  गहिऱ्या डोळ्यांतुनी तुझ्या 


उलझी है तेरी यादें ,कुछ बिगड़ी हुई मेरी आदतें ........ 



लेवून चांदणे आली सजून निशा , दुरावा आपल्यातला गेली त्यजून निशा 
ओढुनी बुरखा लाजेचा आली सुगंधी निशा, घेता मिठीत तुजला आली आगळी नशा
धुंध गेली रात्र सारी, होता असा  बेभान वारा,त्यातुनी तू राजसा स्वप्नी असा आला
पहाटे पहाटे कुठे मिठी सैल झाली , हलकेच स्वप्नातुनी मला जाग आली
सांग मला आता , कसा आवरू हा मोगर्याचा पसारा

कसा आवरू मी मोगऱ्याचा पसारा 





थबकले होते पाऊल तिथे तू सोडलास हात जीथे 
पुसल्या पाऊलखुणा फिरुनी मागे जायचे कोठे, 

पाचोळा उरला जीव बापुडा समाधी पुरता सखे 



पौर्णिमेचा चंद्र वेडा , अंगणी माझ्या आला होता 
रातराणी चा सुगंध , आसमंती दरवळला  होता 
मदहोष  मामला सारा , हाय स्पर्श तुझा धुंद होता 
सांग साजणा मला  , विसरू कशी मी त्या क्षणांना ... 

तो घाव गहिरा पण सुगंधी होता 


गोड हासणे , अबोल बोलणे , नजरेत कटाक्ष भारी 
संकटात पडलो मी , हि ग्वाही तुझी कि शिक्षा भारी

अबोला तुझा जणू पुस्तकातील कोऱ्या कागदा सारखा 
म्हणावे फाडता ही येत नाही ,टाळता हि येत नाही मला

भेटलो किती दिवसांनी , निवांत पणा हि जर गोंधळला 
नजरेच्या भाषेने, मूक संवादांनी सारा आसमंत बहरला ,

एक थेंब तुझ्यासाठी



येऊन जाकी रे आता, नयनी भरला डोह काठोकाठ 
अश्रूंची परीक्षा रोज रोज, खडतर आहे संयमाची वाट
अवंचित येता समोरी सख्या , घट्ट मी डोळे मिटावे 
अश्रूंनी बांधलेले धरण मग एकाएकी फुटावे... 
पुराच्या पाण्यात मग, विरहाचे बांध वाहून जावे ..................................



वाटले बोलायचे कितीदा, शब्द फितूर झाले कितीदा 
भाव लपवलेस कितीदा, लोचनें फितूर झाली कितीदा 
म्हणुनी पाहून डोळ्यात तुझ्या, चुंबिले अधरांना कितीदा 

जे न फुटले शब्दांतुनी ,  ओळखले डोळ्यातून कितीदा 






जे कधी नव्हते तुझ्या मना, का ऐकू येई ते उगा मला 
गुंफताना बंध रेशमांचे,  गुंतले कसे कळेना मला... 

तुझ्या हृदयाच्या वाटा शोधताना, मल्हार साथीला असताना 
लागली नजर कोणाची कि उमटली रेष ललाटी अभाग्याची  
दूर दूर जाता जाता , जवळ जवळ येताना उमगले मला 


जे कधी नव्हते तुझ्या मना, का ऐकू येई ते उगा मला 
गुंफताना बंध रेशमांचे,  गुंतले कसे कळेना मला... 

अबोल लोचनि बरसे मल्हार, थिजलेले अधर अबोल फार  
थरथरते स्वप्न वाहते पावसात , निशब्ध दडलेल्या हुंदक्यात 
क्षितिजा वर गेला प्रवास स्वप्नांचा , दूर जाणाऱ्या समांतर रेषांचा 

जे कधी नव्हते तुझ्या मना, का ऐकू येई ते उगा मला 
गुंफताना बंध रेशमांचे,  गुंतले कसे कळेना मला..





डोळ्यातील काजळ तीचे  , भरून आले आभाळ होते 
ओसंडून बरसण्या साठी , निमीत्त तेवढे शोधीत होते 
टपटप ओघळले  काही थेंब , गालांवर रुळले होते 
सुरईतून सांडलेले मम् पामरा साठी  अमृत दव होते 
उमगून हि सारे कसेबसे मी अधरांना थोपविले होते 

मरूतलातील  संजीवनी, कि होती अमृताची धार ती 
लाभली जरी अधरांना , भागेल का तृष्णा ह्या उरीची 
दहकलेल्या जाणिवांना , जेंव्हा स्पर्ष अमृताचा होतो 
उरतात मागे प्रश्न तरीही , तो थेंब



शायरी कंधे के तील की 

यूँ जो सामने आ जाती हो तुम  बार बार 
तील तुम्हारे कंधे का , जान लेता हर बार 

सोच रहाथा तुमपर कोई किताब लिखूँ कभी 
बस  कभी तुम्हारी आँखों में खो जाता हूँ तो 
कभी तुम्हारे कंधे के तील पर रुक जाता हूँ 
कमब्खत  इनसे छुटकारा ना ही मिले कभी 
खुदा से करता हूँ दुवा, ये किताब अधूरी रहे   

वरना कौन  नहीं चाहता तुम्हे पढ़ना   .... 

काश की हमारी किस्मत भी कभी ऐसी हो 
एक चाँद ख़िले आसमां में , दूसरा बाहों में सिमटा हो 

दस्तूर है कुदरत का , इबादत से खुदा मिलता है 
सागर कितना भी गहरा हो , साहिल से मिलता है 

न इशारा न किनाया (गुप्त सन्देश) न तबस्सुम न कलाम
पास बैठे हैं मगर दूर नज़र आते हैं




अभ्र के चाँद का नजारा देखने उमड़ा है सैलाब ,
मैंने अभी अभी जुल्फोँ मेँ उलझा हुवा चाँद देखा है 

सुर्ख रुख्सार और ये झील सी आँखे 
उसपर ये जुल्फों का साया 
मैंने अक्सर चाँद को महकते देखा है 


जिंदगी बस दो गुटों के बीच फँसी हुइ है 

एक जो अमावस की रात का इंतजार करता है,  
के कब चाँद डूबे और बाहोंमे सिमट जाए 

दूसरा जो पूनमकी रात का इंतजार करता है ,  
के कब चाँद चौखट पे आये और बाहोंमे समां जाए 

बस जिंदगी इन्ही दो गुटों में बट गयी है......... 


मोहब्बत साँस लेती है , कभी सूखे गुलाबोंमे , कुछ बंद किताबोंमे,
कभी तेरी जुल्फोंमे तो कभी उलझी उलझी लटों में,
कुछ तेरी सांसो में , कुछ मेरी सांसो में , 
कभी तेरी परछाई में,  तो कभी मेरी तनहाई में .....
यूँही जिन्दा रहती है , बिन तेरे भी सनम , 
मोहब्बत साँस लेती है



असले जरी मूक अधर तुझे , बोलतात लोचन हे अपार
झुकलेली नजर तुझी, पापण्यां पेलती कुठला भार
घे मिटून डोळे आता पोचली तुझी हाक आर पार
___________________________________________________________________________________

ढीग ठरवले विसरिन तुला, पाहिले आरशात स्वतःला कितीदा,
पाहिले निरखून गेले हरखून , आभास तुझाच झाला कितीदा
जमते कुठे खोटे बोलणे आरशास अनेकदा .....
___________________________________________________________________________________

मिटलेल्या डोळ्यात तिच्या , मुक्या आठवणी होत्या
सुकलेल्या शाई मध्ये त्याच्या , ओल्या भावना होत्या
उरलेले सारे व्यर्थ होते ...त्याला जीवन ऐसे नाव होते

___________________________________________________________________________________

दोन डोळ्यांच्या आभाळात राहील कितीसा
धरशील किती सये थांबवून त्याला आताशा
फुंकर एक मारली तर पडेलच की ढसा ढसा

___________________________________________________________________________________

आली आठवण तुझी काल, पाऊस कोसळत होता 
कापत होते मन माझे , थेंब एक एक ओघळत होता 
हलकेच तुझ्या नावाचा पुकारा मी कितीदा केला होता 
उठले आज सकाळी तरी , देह माझा गंधित होता

___________________________________________________________________________________
कधी उडवतो तर कधी गुंफतो वारा तुझ्या बटांना,
हलकेच मग मी सावरतो तर कधी सोडवितो त्यांना,
मी स्वतःस हरपून जातो भास तुझे होताना ...



तुला टाळण्यासाठी मी नशेत जीव जाळतो
खोल जखमा सुगंधी अजूनही कुरवाळतो

शपथ त्या प्रेमाची मी अजूनही सांभाळतो
झेलताना वार तुझे वेदनांचा जीव गेला, 
रडताना तुझ्या पायी, हुंदक्यांचा जीव गेला,


जखमा तू दिलेल्या सांभाळताना आसवांचा जीव गेला

आली आठवण तुझी काल, पाऊस कोसळत होता
कापत होते मन माझे , थेंब एक एक ओघळत होता
हलकेच तुझ्या नावाचा पुकारा मी कितीदा केला होता
उठले  आज सकाळी तरी , देह माझा  गंधित होता

कधी उडवतो तर कधी गुंफतो वारा तुझ्या बटांना,
हलकेच मग मी सावरतो तर कधी सोडवितो त्यांना,
मी स्वतःस हरपून जातो भास तुझे होताना ..


बसल्या बसल्या काही ओरखडे ओढले 
काहीशी जुनी कोरडी लाकडे तोडली 
साहजिकच काही कोळसे पेटले …निखारे झाले …
अशा जळत्या निखार्यान्वारती बसून 
काही शब्द सांडले ...... 
उरातल्या जखमा आणखीनच लाल झाल्या
आता त्यांची वाफ होउन उडून जातील
गरज आहे एका थेंबांची ...
मग उरेल ती काळी काजळी
लावून तीट गाली तो कवी निघेल
उगाच फुलांची नजर नको लागायला ..
किंवा ठेच कोरड्या आठवणींची …



कधी ऐकतो मी आवाज आसवांचा, कधी अनुभवतो मी स्पर्श भावनांचा,
ठेवले होते डांबून डोळ्यात काही, ठेवल्या होत्या कोंडून मनात काही

तिच्या आठवणींचा तो आलाप की किंकाळ्या त्या मूक जाणीवेच्या


कानाच्या पाळीवरली लाल रक्तिमा
तुझ्या लाजण्याची चाहूल की?
त्याच्या दंत व्रणाची वेदना होती?


ओठांवरती उठलेला व्रण काय सांगतो 
त्याच्या ओठांचे गुपित तू सांगत होतीस 
की चावलास तू ओठ असाच कधीतरी ?

असे कीती प्रश्न मी वेडा विचारतो तुला
तुझे उत्तर मात्र नेहमी तेच असते
डोळे मिटून, पापण्यातुनी अलगद 
तू काही मोती सांडीत असतेस .....

विखुरले काजळ नयनी , छटा गुलाबी पसरली  गाली 
स्मीत हास्याची लकेर , कधी तिच्या अधरी उमटली 

पाहत राहिलो करंटे आम्ही , बरेच काही ती देऊन गेली 


पकडू म्हणता पापण्यात , डोळ्यांनी गद्दारी केली 
लपवू पाहता डोळ्यात , पापण्यांनी परतफेड केली 

ओघळणाऱ्या मोत्यांना , ओलाव्याची जाणीव झाली 

गुणले , भागले , मिळवले  , घटवले  कितीदा
बसलो जुळवायला हिशेब तर काहीच जुळेना ..  
जे जे मिळवले ते ते  बेहिशोबी  गमावले होते .. 

न मोजले जाणारे स्वप्नं सत्यात गवसले  होते 

एक थेंब तुझ्यासाठी
एक थेंब तुझ्यासाठी

अशी तुझी हि साथ असो 
जो करेल मौज तुज संग 
त्याजवर मेहेर परवर दिगार कि हो 

मी हि असो, तूझा तू हि असो 
पावसाचीहि मग बरसात हो 
काय वर तुझा बहाणा हा असो 

जिसका दिल फिर बरसात हो 
30 sep 2022






वसंतोत्सव, २०२१- पार्ट ६। .शुजात हुसैन खान 


खामोश लब  है , झुकी है पलकें , अभी ये उल्फत नयी नयी है 
अभी तकल्लूफ है गुफ़तगू में ,  अभी ये चाहत नयी नयी है 

खामोश लब  है ,झुकी है पलकें 

दिलों मे उल्फत नयी नयी है 

अभी ना आएगी नींद तुमको , अभी न तुमको सुकून मिलेगा 
अभी तो धडकेगा दिल जियादा , अभी मोह्हबत नयी नयी है 


खामोश लब  है ,झुकी है पलकें 

दिलों मे उल्फत नयी नयी है 


थोडासा कुदरत ने क्या नवाजा , के आके बैठे हो मेरे दिल में 
अभी तो दौलत नयी नयी है, अभी ये उल्फत नयी नयी है 

खामोश लब  है ,झुकी है पलकें 

दिलों मे उल्फत नयी नयी है 


जो खानदानी रईस है वह, मिजाज रखते है नरम अपना 
तुम्हारा लिहाजा बता रहा है, तुम्हारी दौलत नयी नयी है 

खामोश लब  है ,झुकी है पलकें 

दिलों मे उल्फत नयी नयी है 


ये इनायत है गजब की, ये बला की मेहरबानी,
मेरी खैरियत भी पूछी , किसी और की जुबानी 

मेरी बेजुबा आँखों से, गिरे जो चाँद कतरे 
जो समज सको तो आंसू, न समझो तो बस पानी 

सुनी नहीं है हमको , किसी और की जुबानी 
तेरे सुबह कह रही है तेरी रात की कहानी 

मेरे खूने आरजू को , वह समझ रहे है पानी 
उन्हें होश तक न आया ये गुजर गयी जवानी 

मुझे फुकने से पहले , मेरा दिल निकल लेना 
किसी और की अमानत , कहीं साथ जल न जाए 

08/03/2021


ख़ामोश लब हैं झुकी हैं पलकें दिलों में उल्फत नई-नई है
अभी तक़ल्लुफ़ है गुफ़्तगू में अभी मोहब्बत नई-नई है
ख़ामोश लब हैं झुकी हैं पलकें दिलों में उल्फत नई-नई है


अभी न आएगी नींद तुमको अभी न हमको सुकूं मिलेगा
अभी तो धड़केगा दिल ज्यादा अभी ये चाहत नई-नई है
ख़ामोश लब हैं झुकी हैं पलकें दिलों में उल्फत नई-नई है


बहार का आज पहला दिन है चलो चमन में टहल के आएं
फ़ज़ां में खुशबू नयी नयी है गुलों पे रंगत रंगत नई-नई है
ख़ामोश लब हैं झुकी हैं पलकें दिलों में उल्फत नई-नई है


जो खानदानी रईस हैं वो मिज़ा रखते हैं नरम अपना
तुम्हारा लहज़ा बता रहा है तुम्हारी दौलत नई-नई है
ख़ामोश लब हैं झुकी हैं पलकें दिलों में उल्फत नई-नई है


जरा सा कुदरत ने क्या नवाजा कि आके बैठे हैं पहली सफ़ में
अभी से उड़ने लगे हवा में अभी तो शोहरत नई-नई है
ख़ामोश लब हैं झुकी हैं पलकें दिलों में उल्फत नई-नई है


बमों की बरसात हो रही है पुराने जांबाज़ सो रहे हैं
गुलाम दुनिया को कर रहा वो जिसकी ताकत नई-नई है
ख़ामोश लब हैं झुकी हैं पलकें दिलों में उल्फत नई-नई है

- शबीना अदीब

Monday, October 17, 2016

भेटेल का ग सजण मला

…

पहाट अबोली, स्वप्न लोचनी ,

असे गुंफलेले , सोडले अधर,
नाद हा खुळा ,मग उगी लागला
सांग सये ……
भेटेल का ग सजण मला

ओल्या दिसाची, वाट कोवळी,
अशी कातरलेली, सोडली मिठी
गंध हा देही , मग भासे वेगळा ,
सांग सये ……
भेटेल का ग सजण मला

धुंद रातीला, कुंद प्रीतीचा
असा सुवासिक, सोडला अंबाडा,
बुडू लागला ,बघ प्राण खुळा,
सांग सये ….
भेटेल का ग सजण मला

(एक थेंब तुझ्यासाठी )
१७ ऑक्टोबर २० १ ३

Thursday, September 22, 2016

एकच राहील आपले आभाळ





एकच राहील आपले आभाळ

प्रेमावर हुकूमत सदा तुझी असावी,
सुलतानी तर कधी अस्मानी असावी
भरडले जावे सदा कोंदणात अशा
नेहमी मर्जी तुझी अशीच चालावी

होती कुठे समज मला , होते तरी कुठे उमगले
वेड तुझे जेव्हा लागले , शब्द फुलू माझे लागले
लिहू लागले मी तुझ्यापरी, प्रेम जसे रुजू लागले


समोरी माझ्या प्रश्न विभोर उभे ठाकले
तृषा कि आतुरता मन गोंधळू लागले
नाराज करू कोणाला उत्तर सुटू लागले
उत्तरात प्रश्नांचे अद्भुत कोडे पडू लागले


जाशील दूर देशी साजणा घडी भरचा मुक्काम
चालते मी वाट जरी , ठाऊक नाही ठिकाण
वळणावरती , होतील जरी दोन वाटा वेगळ्या
एकच राहील आपले आभाळ

एकच राहील आपले आभाळ


एक थेंब तुझ्यासाठी
२२ सप्टेंबर २०१६

Saturday, September 17, 2016

नजरबंदी नव्हे

नजरबंदी नव्हे ती एक मुकी मैफिल होती ....
मोकळ्या शब्दांची ती अनोखी कैद होती
फुटतील कसे बापुडे,
अधरांचीच  तर ती कैफ होती

Friday, September 9, 2016

एक तुळशी माळ आहे.



एक तुळशी माळ आहे.
पाहिलेले स्वप्न आताशा लोप पावत आहे
जातो मी तीथे तुझी आठवण सोबत आहे
वर करी जरी भासे पाषाण कोरडा आहे
उराशी निर्झर ओला तसाच वाहत आहे
जरी वाटे भोवताली ते चित्र मनोहर आहे
रंगुनी सार्या रंगात,तो कोपरा धवल आहे
व्यक्त माझे मन अन शब्द अनमोल आहे
सांगू कसे कोणाला तो भाव अबोल आहे
वाटले जरी कोणास मनमोहक सुगंधी आहे
गुंफिलेल्या आठवणींची एक तुळशी माळ आहे
ती ………
गुंफिलेल्या आठवणींची एक तुळशी माळ आहे
एक थेंब तुझ्यासाठी

Sunday, September 4, 2016

अश्रूंनी बांधलेले धरण

येऊन जाकी रे आता, नयनी भरला डोह काठोकाठ
खडतर आहे संयमाची वाट अश्रूंची परीक्षा रोज रोज
अवंचित येत समोरी सख्या , घट्ट मी डोळे मिटावे
अश्रूंनी बांधलेले धरण  मग एकाएकी फुटावे 

Sunday, August 28, 2016

बरसून जाईल कधीतरी .......


दूरदूर माझ्यापासून तू  काय मिळविलेस जाऊन
तुझ्या डोळ्यात रात्रभर वस्तीला असतोच की मी ,

आपल्यातील वाढवून अंतर काय साधलेस तू
तुझ्या श्वासात हरएक क्षण असतोच कि मी ,

वळवून कूस ,हसून खोटे, पुसून डोळे पुन्हा पुन्हा
जाळून आत्मा लागली का कधी शांत झोप कुणा

सये येईलच आठवण माझी, कधीतरी , कुठेतरी ,
मग दाटले प्रेमाचे आभाळ, बरसून जाईल कधीतरी

बरसून जाईल कधीतरी .......

एक थेंब तुझ्यासाठी
28 August 2016

Sunday, July 17, 2016

काय सांगू , कळेना मला .......





काय सांगू , कळेना मला .......


बदलली आहे हवा आज जरा ...
उडती आज बटा भूर भूर जरा  
रंग फुलांचे भासती नवे मला
विचारले कोणी काही मला

काय सांगू , कळेना मला .......

का ग कोकीळ गातो असा वेडा
आला श्रावण तरी का हा खुळा
येतो कुठून हा आर्त-स्वर आगळा
विचारले कोणी काही मला

काय सांगू , कळेना मला .......


एक थेंब तुझ्यासाठी
१७ जुलै २०१६



Saturday, July 9, 2016

आठवते मज सारे , पडता पाऊस चोहीकडे




आठवते मज सारे , पडता पाऊस चोहीकडे

तशातच..

ते उठलेले वादळ, तो सुटलेला वारा,
ते दाटलेले काळे ढग, तो निसर्गाचा इशारा,
आठवणी ह्या मजपाशी...

तशातच....
कडाडणारी वीज, कोसळणारा पाऊस,
कुंदधुंध हि हवा, ओले ओले कासावीस मन
आठवणी ह्या साऱ्या मजपाशी...

तशातच...
तुला झालेला पहिला स्पर्श, तू घेतलेले ते चुंबन,
मोहरलेले ते यौवन, उठलेले ते रोमांच
आठवणी ह्या साऱ्या मजपाशी....

कोरड्या मनाला, समजावीत उभी मी उंबर्याशी..
सांगू कुणा आता साऱ्या, गेला साजण दूरदेशी
गेला साजण दूरदेशी..

एक थेंब तुझ्यासाठी

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...