एकच राहील आपले आभाळ
प्रेमावर हुकूमत सदा तुझी असावी,
सुलतानी तर कधी अस्मानी असावी
भरडले जावे सदा कोंदणात अशा
नेहमी मर्जी तुझी अशीच चालावी
होती कुठे समज मला , होते तरी कुठे उमगले
वेड तुझे जेव्हा लागले , शब्द फुलू माझे लागले
लिहू लागले मी तुझ्यापरी, प्रेम जसे रुजू लागले
समोरी माझ्या प्रश्न विभोर उभे ठाकले
तृषा कि आतुरता मन गोंधळू लागले
नाराज करू कोणाला उत्तर सुटू लागले
उत्तरात प्रश्नांचे अद्भुत कोडे पडू लागले
जाशील दूर देशी साजणा घडी भरचा मुक्काम
चालते मी वाट जरी , ठाऊक नाही ठिकाण
वळणावरती , होतील जरी दोन वाटा वेगळ्या
एकच राहील आपले आभाळ
एकच राहील आपले आभाळ
एक थेंब तुझ्यासाठी
२२ सप्टेंबर २०१६
No comments:
Post a Comment