आवर की स्वतःला जरा
थरथरणारे ओठ तुझे, वर बटा करती धिंगाणा
टपोरे ते भरलेले डोळे, पदरात तुझ्या नाचतो वारा
सांग मग कसा न बरसेल तो पाऊस खुळा
दरवळतो मादक सुगंध श्वासातुनी तुझ्या
हाय कितीदा नेले त्यांनीच समीप तुझ्या
रोमरोमातील मोगरा, जाळतो मला पुन्हा पुन्हा
भूर भूरणाऱ्या बटांना सांग वारा कसा आवरेल ?
खट्याळ भावनांना सांग चेहरा कसा लपवेल ?
वर म्हणते ती कशी मला, आवर की स्वतःला जरा
आवर की स्वतःला जरा
एक थेंब तुझ्यासाठी
१० नोव्हेंबर २०११
No comments:
Post a Comment