Thursday, June 23, 2011

अबोलीच्या फुलाने धरावा अबोला


अबोलीच्या फुलाने धरावा अबोला

कधी फिरवला हात  हळुवार,
कधी घातली फुंकर अलगद,
तर कधी स्पर्श हलकेच  केला,
सांगा असा मी काय गुन्हा केला? 
कि अबोलीच्या फुलाने धरावा अबोला

येवूनी स्वप्नात कधी जागविले कळीला, 
तर कधी होवुनी वारा हसवले कळीला,
होवुनी दवबिंदू मी लाजविले फुलाला,
सांगा ह्यात काय गुन्हा झाला
कि अबोलीच्या फुलाने धरावा अबोला

कधी होवुनी फुलपाखरू चुंबिले फुलाला,
कधी होवुनी भ्रमर नादविले फुलाला,
कधी होवून चतुर भुलविले मी फुलाला, 
सांगा ह्यात काय गुन्हा झाला?
कि अबोलीच्या फुलाने धरावा अबोला

अबोलीचे फुल ते बोलणार नाही,
भाषा मला अबोलीची येत नाही,
ओढ प्रीतीची थांबणार नाही,
सांगा ना कधी सुटणार हा तिढा 
बोलेल का अबोली की , राहील असाच अबोला 

सांगा ह्यात काय गुन्हा झाला?
कि अबोलीच्या फुलाने धरावा अबोला

एक थेंब तुझ्यासाठी 

Wednesday, June 22, 2011

पोतेरे ..... (पायपुसणे) इत्यादी इत्यादी...


पोतेरे ..... (पायपुसणे)  इत्यादी इत्यादी...

साधारण पणे पोतेरे किंवा पायपुसणे हे सर्वानुमते, नाक मुरडण्याचे विषय आहेत. पटकन आपण  बोलून जातो, काय पण फाटके पोतेरे होण्याची लक्षणे आहेत. तसे सर्वांच्याच डोळ्यात सलणारे आणि दुर्लक्षलेले पोतेरे असते. साहजिकच आहे म्हणा , त्याचे  तसे उद्दातीकरण करण्याचा मोह आज पर्यंत न कोण्या साहित्तीकाना किंवा कवींना झाला. अनेक जणांना वाटले असेल त्यात काय बर एवढे वेगळे असेल ज्यावर कोणी काही लिहू शकतो? किंबहुना जो कोणी ह्या वर लिहू शकतो तो बहुधा काहीतरीच लिहिणारा असावा ....

म्हणून मग ठरवले कि ह्या विषयवार पण काहीतरी लिहावे,  आणि सहज सुचले 

भरजरी शालू होता तिच्या अंगावर, काय त्या शालूची शान होती,
कधी ड्र्य क्लीनिग , तर कधी रेशमी वस्त्रात त्याची पहाट होती,
तिचे रूप खुलवत होता, तो पर्यंत शालुचे कौतुक आणि लाड होत होते,
एक दिवस काय झाले , कोणास ठावूक,  तिला वाटले शालू जुना झाला,
पूर्वी सारखी सर आता नाही त्याला, झाले कि वापरून किती दिवस ह्याला
कित्ती दिवस तोच तोच नेसायचा, नेहमी नेहमी तोच तोच पाहायचा, 
खुणावतात नवीन कपडे तिला , तिला शालूची गरज वाटत नाही, 
ठेवून पहिला तिने काही दिवस त्याला इतर कपड्यात,
कपाटातहल्ली तिला खरा सांगू का त्याची अडगळ होत होती, 
मग काय एक दिवस मोठ्या हिम्मतीने तिने एक काम केले
घरातल्याच कात्रीने शालुचे चांगले चार पाच तुकडे केले, 
चला आठवण म्हणून फोटोन मध्ये आहेच कि, कपाटात कशाला,
असे म्हणून एक दिवस त्याचे तिने पोतेरे केले.......
भरजरी शालुचे ..झाले भरजरी पोतेरे... हं हं हं हं काहीतरी चुकतंय बरे,
पुढच्या खोलीत, मग शेज घरात, मग स्वयंपाक खोलीत , करता  करता
शेवटी पोतेरे दारा बाहेर आले....
शालू तो कालचा आज पोतेरे होवून पडला दारात, 
खरे तर तेच त्याचे नशीब होते, तोच आता स्वतःला समजावत होता 
पोतेरे होण्यात एक मज्जा आहे, कुंकवाचा थाट नसली तरी,
पायाच्या धुळीची वेगळीच नशा आहे ......

घरात हल्ली जाता येताना पाय त्यालाच पुसतात 
आणि म्हणे कुठेतरी वाचले आहे शालुने 
पायधूळच  म्हणे शेवटी , कपाळाला लावतात

पोतेऱ्याचे पुराण इथेच संपले, अहो पुराण कसले ..पाय पुसून पुसून त्याचे आयुष्याच संपले

जेन्ह्वा  तिने हे पोतेरे पुराण कुठेतरी वाचले, 
तेन्ह्वा पासून म्हणे शालू चा भाव हल्ली फार वाढला आहे...
शालुचे पोतेरे करणे ह्यातच म्हणे हल्ली मज्जा आहे ....

एक थेंब तुझ्यासाठी 

Monday, June 20, 2011

महागाई महागाई म्हणजे काय?

महागाई महागाई म्हणजे काय?

वस्तूंच्या भावात जेन्ह्वा एक चढता आलेख दिसू लागतो त्या चढ्या आलेखाचे नाव महागाई  होय. अशी महागाई हि काही ठराविक अशा वस्तूंच्या ठोकळ भावांशी निगडीत असते. महागाई हि तशी कोणालाच नको असलेली परंतु अर्थशास्त्रात अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. खरे सांगायचे तर महागाई नसेल तर विकसित  आणि विकसनशील राष्ट्रात लोक सुखीच राहू शकणार नाहीत. हे म्हणजे औषध कडू असते पण ते आवश्यकच असते अशा प्रकारात मोडते. परंतु हेच औषध जरा जास्त झाले कि प्राण जातो हि वस्तुस्तिथी आहे हे नाकारून चालणार नाही.

ह्या बाबत एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते ..अमेरिकेच्या काही प्रांतानमध्ये आजही रेड इंडिअन लोकांची वस्ती आहे , जे लोक थंडीची चाहूल लागली कि लगेच सर्पणा करिता लाकूड गोळा करू लागतात. वर्षा नु वर्षाच्या अनुभवाच्या आधारे त्या रेड इंडिअन टोळीचा म्होरक्या हे ठरवतो कि ह्या वर्षी थंडी किती पडेल आणि तिला तोंड द्यायचे तर किती लाकूड फाटा जवळ असावा. अगदी साधे गणित आहे, जास्त लाकूड फाटा जास्त थंडी,  कमी लाकूड फाटा कमी थंडी. 
एकदा , ह्या रेड इंडिअन टोळीचा म्होरक्या काही कारण साठी सुट्टीवर होता आणि त्या टोळीची सूत्रे एका नव्या ( आय टी वाल्या) दमाच्या तरुण कडे होती. हा तरुण पारंगत होता पण अनुभव समृद्ध नव्हता. जस जशी थंडीची चाहूल लागू लागली टोळीतले लोक विचारू लागले या वर्षी किती लाकडे जमवायची? ह्या पाठ्य्याने अमेरिकेच्या हवामान खात्याची वेब साईट उघडून पहिले कि त्यांचे काय भाकीत आहे. तिथे त्याला तसे काहीच दिसले नाही म्हणून त्याने सांगितले कि जमवायला हरकत नाही लाकडे पण हळू हळू जमवा. काही दिवसांनी पुन्हा लोक विचारू लागले आता काय करायचे, ह्याने पुन्हा तोच उद्योग केला वेब साईट उघडून पहिली आणि सांगितले थंडी हळू हळू वाढत आहे, आता लाकडे जोरात जमवा...  काही दिवसांनी पुन्हा टोळी वाली लोक त्याच्या जवळ आली आणि म्हणाली....आता काय करायचे ह्यांनी पुन्हा वेब साईट उघडून बघितली आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला  त्यात लिहिले होते ...रेड इंडिअन जमातीची लोके जोमाने लाकडे गोळा करत आहेत म्हंजे ह्या वर्षी हि जोरदार थंडीची अपेक्षा करायला हरकत नाही...

आहे कि नाही गम्मत...

असेच काहीसे  महागाई आणि तिच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचे आहे...जो तो दुसर्या कडे बोट दाखवून महागाई चा बागुलबुवा उभा करतो...सरते शेवटी हाच बागुलबुवा खरा राक्षस होवून तुम्हा आम्हला खावून टाकतो...

उगाच नाही पिपली लाइव मध्ये महागाई ला डायन म्हणजे राक्षाशिनीची  ची उपमा दिली आहे   हा हा हा ...

Monday, June 13, 2011

कभी कभी मेरे दिलमे ये खयाल आता है


कभी कभी मेरे दिलमे ये खयाल आता है 

तुम्हारी गीली  जुल्फों के निचे , तुम्हारे काँधे के बस थोडासा उप्पर 
तुम्हारी नशीली गर्दन पे, तुम्हारे कान के पीछे ..
कुछ भुलसा गया हूँ 
चूम लेने दो उन गीली यांदो को जरा हलकेसे मुझे ..
बस जिंदगी गीली गीली हो जाये यूँही कभीकभी ...

तुम्हारे गिले ख्वाबोंमे, तुम्हारी गीली मुस्कान पर
तुम्हारे गिले बदन पर, बस उस गुलाबी गिले होंठोपर
न जाने कुछ भुलसा गया हूँ 
चूमकर तुम्हारे लब्ज को यूँही , पि लेनेदो मुझे गीली यांदों को 
बस खाव्ब मेरे भी इंतजार में है गिले होने के कभी कभी 

तुम्हारे उस गिले दुपट्टे के पीछे, तुम्हारी उन गीली ह्नसो की जोड़ीपे
तुम्हारे गिले गिले गलेंमे, उस उतरती हुवी गीली लाटओंपर
न जाने कुछ भुलसा गया हूँ
चूमकर तुम्हारे उस हसीं यौवन को, होने दो गिला मुझे यूँही कभी
बस बारिश बहार यूँही गिरती रहे, खयाल मेरे गिले होते रहे 

कभी कभी मेरे दिलमे ये खयाल आता है 

एक बूँद आपकेलिये 

पाऊस बाहेर पडतो ...


पाऊस बाहेर पडतो ...

तुझ्या मोकळ्या केसांखाली, गोर्या खांद्याच्या जरा वर 
मानेवरती ...कानाच्या मागे....काही विसरलो आहे ...
घेवू का टिपून ते क्षण जे अजून किंचित ओले आहेत...

तुझ्या कंचुकीच्या आत, तुझ्या डौलदार वक्षानवरती,
त्या खोलदार घळीत, मधेच काही  राहिले आहे
घेवू का ते क्षण टिपून जे अजून किंचित ओले आहेत

तुझ्या साडीच्या निर्यांमध्ये, तुझ्या कामाक्षी कमरेवरती,
त्या नाभीच्या जरा खाली, ओटीपोटावर....काही राहिले आहे
घेवू का ते क्षण टिपून जे अजून किंचित ओले आहेत

असे ओले ओले क्षण टिपता , मी ओला चिंब झालो.
पाऊस पडतो बाहेर मी आतल्या आताच पुरता भिजून गेलो

एक थेंब तुझ्यासाठी 

Tuesday, June 7, 2011

प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे...


अश्रू ते लोचनी लपवतेस कशाला ?
सांग  पापण्यांना फसवतेस कशाला ?

शब्द येता ओठी त्यास अडवतेस कशाला?
मग चावून अधराना दुखावतेस कशाला?

येता विचार मनी, दडवतेस कशाला?
देवूनी हुंदके मग रडतेस कशाला?

गर्दी  भावनांची, तू झाकतेस कशाला
भाव विभोर चेहर्याला , असली शिक्षा कशाला 

कशा कशाला तू  फसवशील, रडवशील, झाकशील
आठवण येता त्याची राहवेल का त्या खळ्यांना 

खुदकन हसून फोडतील सारे भांडे तुझे ...
प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....

एक थेंब तुझ्यासाठी 

Friday, June 3, 2011

पहिला पाऊस


पहिला पाऊस



पहिला पाऊस काय पडला आणि तिची अवस्था काही विचारू नका. सगळे आपले भिजले पहिल्या पावसात तर हि आपली उभी उंबरठ्यात , त्याची वाट पाहात. अहो पण वाट कोणाची पाहात उभी आहेस विचारले तिला? तर म्हणे जावूदे ग माहित आहे त्याला. जिथे सगळी दुनिया पहिल्या पावसाची मज्जा लुटत आहे, तिथे हि आपली बसली आहे तिष्ठत. इतके दिवस बरे चालले होते. पाऊस नव्हता त्यामुळे होणार्या लाही लाही मध्ये काहीच सुचत नव्हते. आता मात्र तसे नाही, पाऊस पडून गेला कि म्हणे उन्हाळ्यात लागलेले वणवे शांत होतात. इथे तर चित्र वेगळेच दिसते आहे. तो पाऊसच इथे वणवा पेटवतो आहे. घ्या आता...



पहिला पाऊस हा काही नेहमी सुखद असेलच असे नाही....तर तिच्या मनीची वेदना त्या पहिल्या पावसात तरी त्याला कळेल का ? त्या बाहेर भिजणाऱ्या तिच्या सख्यांना तरी समजेल का?



साजण माझा दूरदेशी...उभी मी उंबरठ्यात काय करील हा पाऊस असा बरसून...

कळेल का त्याला माझ्या मनीची व्यथा, कि पुन्हा हा बहार असाच ओसरून जाईल ???

सांगू कशी मी त्याला भावना मनीच्या, शब्दानाही असतात मर्यादा कधी ओठांच्या ...



मग तिचीही अवस्था त्या अनारकली सारखी होते , पहिल्या पावसात ती पुटपुटते ..



इस इंतज़ार -ए -शौक को जन्मों की प्यास है

इक शमा जल रही है , तो वो भी उदास है

मोहब्बत ऐसी धड़कन है , जो समझाई नहीं जाती

जुबां पर दिल की बेचैनी , कभी लायी नहीं जाती



एक थेंब तुझ्यासाठी

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...