अबोलीच्या फुलाने धरावा अबोला
कधी घातली फुंकर अलगद,
तर कधी स्पर्श हलकेच केला,
सांगा असा मी काय गुन्हा केला?
कि अबोलीच्या फुलाने धरावा अबोला
येवूनी स्वप्नात कधी जागविले कळीला,
तर कधी होवुनी वारा हसवले कळीला,
होवुनी दवबिंदू मी लाजविले फुलाला,
सांगा ह्यात काय गुन्हा झाला
कि अबोलीच्या फुलाने धरावा अबोला
कधी होवुनी फुलपाखरू चुंबिले फुलाला,
कधी होवुनी भ्रमर नादविले फुलाला,
कधी होवून चतुर भुलविले मी फुलाला,
सांगा ह्यात काय गुन्हा झाला?
कि अबोलीच्या फुलाने धरावा अबोला
अबोलीचे फुल ते बोलणार नाही,
भाषा मला अबोलीची येत नाही,
ओढ प्रीतीची थांबणार नाही,
सांगा ना कधी सुटणार हा तिढा
बोलेल का अबोली की , राहील असाच अबोला
सांगा ह्यात काय गुन्हा झाला?
कि अबोलीच्या फुलाने धरावा अबोला
एक थेंब तुझ्यासाठी
No comments:
Post a Comment