पाऊस बाहेर पडतो ...
मानेवरती ...कानाच्या मागे....काही विसरलो आहे ...
घेवू का टिपून ते क्षण जे अजून किंचित ओले आहेत...
तुझ्या कंचुकीच्या आत, तुझ्या डौलदार वक्षानवरती,
त्या खोलदार घळीत, मधेच काही राहिले आहे
घेवू का ते क्षण टिपून जे अजून किंचित ओले आहेत
तुझ्या साडीच्या निर्यांमध्ये, तुझ्या कामाक्षी कमरेवरती,
त्या नाभीच्या जरा खाली, ओटीपोटावर....काही राहिले आहे
घेवू का ते क्षण टिपून जे अजून किंचित ओले आहेत
असे ओले ओले क्षण टिपता , मी ओला चिंब झालो.
पाऊस पडतो बाहेर मी आतल्या आताच पुरता भिजून गेलो
एक थेंब तुझ्यासाठी
No comments:
Post a Comment