महागाई महागाई म्हणजे काय?
वस्तूंच्या भावात जेन्ह्वा एक चढता आलेख दिसू लागतो त्या चढ्या आलेखाचे नाव महागाई होय. अशी महागाई हि काही ठराविक अशा वस्तूंच्या ठोकळ भावांशी निगडीत असते. महागाई हि तशी कोणालाच नको असलेली परंतु अर्थशास्त्रात अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. खरे सांगायचे तर महागाई नसेल तर विकसित आणि विकसनशील राष्ट्रात लोक सुखीच राहू शकणार नाहीत. हे म्हणजे औषध कडू असते पण ते आवश्यकच असते अशा प्रकारात मोडते. परंतु हेच औषध जरा जास्त झाले कि प्राण जातो हि वस्तुस्तिथी आहे हे नाकारून चालणार नाही.
ह्या बाबत एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते ..अमेरिकेच्या काही प्रांतानमध्ये आजही रेड इंडिअन लोकांची वस्ती आहे , जे लोक थंडीची चाहूल लागली कि लगेच सर्पणा करिता लाकूड गोळा करू लागतात. वर्षा नु वर्षाच्या अनुभवाच्या आधारे त्या रेड इंडिअन टोळीचा म्होरक्या हे ठरवतो कि ह्या वर्षी थंडी किती पडेल आणि तिला तोंड द्यायचे तर किती लाकूड फाटा जवळ असावा. अगदी साधे गणित आहे, जास्त लाकूड फाटा जास्त थंडी, कमी लाकूड फाटा कमी थंडी.
एकदा , ह्या रेड इंडिअन टोळीचा म्होरक्या काही कारण साठी सुट्टीवर होता आणि त्या टोळीची सूत्रे एका नव्या ( आय टी वाल्या) दमाच्या तरुण कडे होती. हा तरुण पारंगत होता पण अनुभव समृद्ध नव्हता. जस जशी थंडीची चाहूल लागू लागली टोळीतले लोक विचारू लागले या वर्षी किती लाकडे जमवायची? ह्या पाठ्य्याने अमेरिकेच्या हवामान खात्याची वेब साईट उघडून पहिले कि त्यांचे काय भाकीत आहे. तिथे त्याला तसे काहीच दिसले नाही म्हणून त्याने सांगितले कि जमवायला हरकत नाही लाकडे पण हळू हळू जमवा. काही दिवसांनी पुन्हा लोक विचारू लागले आता काय करायचे, ह्याने पुन्हा तोच उद्योग केला वेब साईट उघडून पहिली आणि सांगितले थंडी हळू हळू वाढत आहे, आता लाकडे जोरात जमवा... काही दिवसांनी पुन्हा टोळी वाली लोक त्याच्या जवळ आली आणि म्हणाली....आता काय करायचे ह्यांनी पुन्हा वेब साईट उघडून बघितली आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला त्यात लिहिले होते ...रेड इंडिअन जमातीची लोके जोमाने लाकडे गोळा करत आहेत म्हंजे ह्या वर्षी हि जोरदार थंडीची अपेक्षा करायला हरकत नाही...
आहे कि नाही गम्मत...
असेच काहीसे महागाई आणि तिच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचे आहे...जो तो दुसर्या कडे बोट दाखवून महागाई चा बागुलबुवा उभा करतो...सरते शेवटी हाच बागुलबुवा खरा राक्षस होवून तुम्हा आम्हला खावून टाकतो...
उगाच नाही पिपली लाइव मध्ये महागाई ला डायन म्हणजे राक्षाशिनीची ची उपमा दिली आहे हा हा हा ...
No comments:
Post a Comment