Wednesday, June 22, 2011

पोतेरे ..... (पायपुसणे) इत्यादी इत्यादी...


पोतेरे ..... (पायपुसणे)  इत्यादी इत्यादी...

साधारण पणे पोतेरे किंवा पायपुसणे हे सर्वानुमते, नाक मुरडण्याचे विषय आहेत. पटकन आपण  बोलून जातो, काय पण फाटके पोतेरे होण्याची लक्षणे आहेत. तसे सर्वांच्याच डोळ्यात सलणारे आणि दुर्लक्षलेले पोतेरे असते. साहजिकच आहे म्हणा , त्याचे  तसे उद्दातीकरण करण्याचा मोह आज पर्यंत न कोण्या साहित्तीकाना किंवा कवींना झाला. अनेक जणांना वाटले असेल त्यात काय बर एवढे वेगळे असेल ज्यावर कोणी काही लिहू शकतो? किंबहुना जो कोणी ह्या वर लिहू शकतो तो बहुधा काहीतरीच लिहिणारा असावा ....

म्हणून मग ठरवले कि ह्या विषयवार पण काहीतरी लिहावे,  आणि सहज सुचले 

भरजरी शालू होता तिच्या अंगावर, काय त्या शालूची शान होती,
कधी ड्र्य क्लीनिग , तर कधी रेशमी वस्त्रात त्याची पहाट होती,
तिचे रूप खुलवत होता, तो पर्यंत शालुचे कौतुक आणि लाड होत होते,
एक दिवस काय झाले , कोणास ठावूक,  तिला वाटले शालू जुना झाला,
पूर्वी सारखी सर आता नाही त्याला, झाले कि वापरून किती दिवस ह्याला
कित्ती दिवस तोच तोच नेसायचा, नेहमी नेहमी तोच तोच पाहायचा, 
खुणावतात नवीन कपडे तिला , तिला शालूची गरज वाटत नाही, 
ठेवून पहिला तिने काही दिवस त्याला इतर कपड्यात,
कपाटातहल्ली तिला खरा सांगू का त्याची अडगळ होत होती, 
मग काय एक दिवस मोठ्या हिम्मतीने तिने एक काम केले
घरातल्याच कात्रीने शालुचे चांगले चार पाच तुकडे केले, 
चला आठवण म्हणून फोटोन मध्ये आहेच कि, कपाटात कशाला,
असे म्हणून एक दिवस त्याचे तिने पोतेरे केले.......
भरजरी शालुचे ..झाले भरजरी पोतेरे... हं हं हं हं काहीतरी चुकतंय बरे,
पुढच्या खोलीत, मग शेज घरात, मग स्वयंपाक खोलीत , करता  करता
शेवटी पोतेरे दारा बाहेर आले....
शालू तो कालचा आज पोतेरे होवून पडला दारात, 
खरे तर तेच त्याचे नशीब होते, तोच आता स्वतःला समजावत होता 
पोतेरे होण्यात एक मज्जा आहे, कुंकवाचा थाट नसली तरी,
पायाच्या धुळीची वेगळीच नशा आहे ......

घरात हल्ली जाता येताना पाय त्यालाच पुसतात 
आणि म्हणे कुठेतरी वाचले आहे शालुने 
पायधूळच  म्हणे शेवटी , कपाळाला लावतात

पोतेऱ्याचे पुराण इथेच संपले, अहो पुराण कसले ..पाय पुसून पुसून त्याचे आयुष्याच संपले

जेन्ह्वा  तिने हे पोतेरे पुराण कुठेतरी वाचले, 
तेन्ह्वा पासून म्हणे शालू चा भाव हल्ली फार वाढला आहे...
शालुचे पोतेरे करणे ह्यातच म्हणे हल्ली मज्जा आहे ....

एक थेंब तुझ्यासाठी 

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...