Sunday, March 29, 2015

जीथे होते थीजले निखारे दवाने



जीथे होते थीजले निखारे दवाने
तृषा का भागली फक्त एका थेंबाने

जाळणारा पाउस आला परत जोमाने
रोमरोमातुनी चेतवून गेला निखारे

डुंबले किती तरी वर यावे नव्याने
खोल किती राहावे मनाच्या तळाने

सांडला प्राजक्त अंगणात कशाने
नकळत झालेल्या अबोल स्पर्शाने

एक थेंब तुझ्यासाठी
२९ मार्च २०१५

Sunday, March 8, 2015

परी सौदागिरी येत नाही ......


दुनियेतला मी जरी, परी दुनियेचा चाहता नाही
चालतो या बाजारी जरी,  परी ग्राहक मी नाही

असलो हृदयात जरी, परी वेदना मी नाही
नाद मधुर उठला जरी, परी कंपने माझी नाही

वाटलो बिमार जरी, परी आजारी मी नाही
असलो वैदू किती जरी, परी औषध ठावूक नाही

भाव मला ठावूक जरी, परी व्यापारी मी नाही
सौद्याचे कळले मोल जरी, परी सौदागिरी येत नाही
एक तेवढी परी सौदागिरी येत नाही

एक थेंब तुझ्यासाठी
८ मार्च २०१५

Tuesday, March 3, 2015

ओढून धुक्याची दुलई


ओढून धुक्याची दुलई आले मी बेभान इथवर 
कळले न मला नजरेतुनी तुझ्या पोचले कुठवर 
दुलईत धुक्याच्या राहूदेत लपेटूनी मजला 
पहाटेच्या गुलाबी थंडीत मिठीत तुझ्या साजणा 
कायमची निजुदेना मला ………………

सावर ग सये तुझ्या उनाड बटा ,



हाय रोज वेग वेगळ्या छटा ,
सावर ग सये तुझ्या उनाड बटा ,

काळजाच्या जखमांनी दिली वर्दी
पौर्णिमेच्या चांदण्यांचा घाव वर्मी

ऋतूही आताशा लागले बघ छळू
ऐन वसंतात बहर लागला गळू

कल्लोळ भावनांचे  उमटू लागले
मंदिरातले दिवे विझू लागले

इर्षेत भ्रमर सारे बघ जळू लागले
ऐकून कहाणी सारे पळू लागले

हर एक दिवस , हर एक अदा
सावर ग सये तुझ्या उनाड बटा

एक थेंब तुझ्यासाठी
०३ मार्च  २०१५

Saturday, February 28, 2015

कहाँ से आई है ये बेरुखी ?

कहाँ से आई है ये बेरुखी ? मुझमे मुझको पता नहीं
वरना जिंदगी तो कुछ सिक्के, कुछ पल , कुछ बातों में
यूँही गुजर जाती थी.....

ये हवा, ये मौसम ,ये नज़ारे कुछ अलग अंदाज बयां करते है
कुछ छींटे बौछारोंकी , कुछ बुँदे सावन की ,
कभी मासूम हुवा करती थी।

दुखों को पीछे छोड़ने की जद्दो जिहाद में
खुशियोंकी तलाश में.ज़िन्दगि मौताज हो गई

नजाने कहांसे आई ये बेरुखी ? मुझमे मुझको पता नहीं 

Friday, November 28, 2014

थ्यांक्स गिव्हिंग सुरु आहे ........


वखवखलेले डोळे , आसुसलेल्या जिभा
हाव काही सुटेना, फाटून गेला जरी खिसा

ओता पाणी कितीही तहान काही भागेना
ओरपण्याची सवय काही केल्या जाईना

डिसकाउंट हवे ह्यांना, कुपन हवे सर्वदा
भूक ह्यांची भागणार कधी हेच समजेना

ओढाओढी, रेटारेटी लांबचलांब रांगा सुरु
ह्या भुकेल्या भसमासुरांची पोटे कशी भरू

पाहून हे सारे खिन्नता मनी डोकावु लागे
थिजून गेले मन माझे,सुन्न झाले डोके,

हर एक हपापलेल्या राक्षसांची कहाणी वेग वेगळी
दारी असूनही समृद्धता, समाधानी रिकामी झोळी

वाटेल तुम्हाला काय हे चालू आहे काय मी बोलू
सांगतो तुम्हाला , पटणार नाही तरीहि

थ्यांक्स गिव्हिंग सुरु आहे …. एक शब्द नका बोलू

एक थेंब तुझ्यासाठी 

Thursday, November 27, 2014

पापण्या मिटून सये खुदकन अशी हसलीस का


पापण्या मिटून सये खुदकन अशी हसलीस का
घायाळ मी कसा झालो वर विचारतेस का आता

दाबून हलकेच ओठ, केलास तो दंश लटके पहाता
हरपले भान, आला कंठाशी प्राण, थांब जराशी आता
सांग आणू मी कोठून जालीम विषाचा उतारा आता

घायाळ मी कसा झालो वर विचारतेस का आता

आवळताना मिठीत तुजला बावरलीस का आता
मोहरली बघ काया, किती घेशील चोरून तरी आता
नकोस घेवू आढेवेढे ,चालणार नाही बदमाशी आता ,

घायाळ मी कसा झालो वर विचारतेस का आता
घायाळ मी कसा झालो वर विचारतेस का आता

एक थेंब तुझ्यासाठी
27 November 2014

Saturday, October 18, 2014

सुगंधी कबर



कबरीतल्या निजलेल्या मूर्तीला,  कुर्निसात मी करून गेलो
नकळत चुंबिता शब्दांना , माझे मी पण हरवून गेलो …
टेकवूनी  माझे ओठ नावावरती तुझ्या ….
अमृतप्राशन मी करून गेलो…
अंतरीतल्या आत्म्याला सुगंधी करून गेलो.

एक थेंब तुझ्यासाठी 

Friday, September 26, 2014

तू दिलेला प्रेमाचा तुकडा


तू दिलेला प्रेमाचा तुकडा तसाच पडून आहे
लावून हात त्याला मी जखमी कशास होवू
कारण रुधीराला व्यक्त होण्याचे मी का देवू ?

तू दिलेला शब्द नी शब्द मी जपून ठेवला आहे
का ते शब्द बोलत नाही उमगे न मला हे कोडे
मौनात सारे अर्थ दडलेले ,मौन बिचारे झाले वेडे

एक कवडसा  माझ्या अंगणातला कातरलेला
आठवते का स्पर्शून गेला होता तुला कधीतरी
थडग्यावर आहे तसाच तो सुकलेल्या पानापरी

अचानक आवाज पाचोळा पानांचा येत आहे
जपून चाल सये सांभाळ ग स्वतःला जरासे
तू दिलेला प्रेमाचा तुकडा तिथेच पडून आहे
तिथेच कुठेतरी पडून आहे ………

एक थेंब तुझ्यासाठी
२६ /०९/२०१४

Wednesday, September 17, 2014

दव बिंदूचा सडा


शब्द अडखळले ओठात ,भावना कोंडल्या मनात,
दाटला स्वर कंठात, पापण्यात थिजला कटाक्ष
होते मोकळे अश्रु… वाहिले पुरात …
सांडले होते काही मखमली तृणान वरती
पावला गणिक जाणवला तो ओलावा
वाचली मी कविता त्याची
उमगले मला … तो नव्हता
दव बिंदूचा सडा
तो नव्हता …. दव बिंदूचा सडा

एक थेंब तुझ्यासाठी
१७ /०९/२०१४

Tuesday, September 9, 2014

एक तुळशी माळ आहे.



पाहिलेले स्वप्न आताशा लोप पावत आहे
जातो मी तीथे तुझी आठवण सोबत आहे

वर करी जरी भासे पाषाण कोरडा आहे
उराशी निर्झर ओला तसाच वाहत आहे

जरी वाटे भोवताली ते चित्र मनोहर आहे
रंगुनी सार्या रंगात,तो कोपरा धवल आहे

व्यक्त माझे मन अन शब्द अनमोल आहे
सांगू कसे कोणाला तो भाव अबोल आहे

वाटले जरी कोणास मनमोहक सुगंधी आहे
गुंफिलेल्या आठवणींची एक तुळशी माळ आहे

एक थेंब तुझ्यासाठी

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...