तू दिलेला प्रेमाचा तुकडा तसाच पडून आहे
लावून हात त्याला मी जखमी कशास होवू
कारण रुधीराला व्यक्त होण्याचे मी का देवू ?
तू दिलेला शब्द नी शब्द मी जपून ठेवला आहे
का ते शब्द बोलत नाही उमगे न मला हे कोडे
मौनात सारे अर्थ दडलेले ,मौन बिचारे झाले वेडे
एक कवडसा माझ्या अंगणातला कातरलेला
आठवते का स्पर्शून गेला होता तुला कधीतरी
थडग्यावर आहे तसाच तो सुकलेल्या पानापरी
अचानक आवाज पाचोळा पानांचा येत आहे
जपून चाल सये सांभाळ ग स्वतःला जरासे
तू दिलेला प्रेमाचा तुकडा तिथेच पडून आहे
तिथेच कुठेतरी पडून आहे ………
एक थेंब तुझ्यासाठी
२६ /०९/२०१४
No comments:
Post a Comment