Sunday, September 2, 2018

ठाऊक नसते कोणा .....





ठाऊक नसते कोणा


भेटतो आपण कितीदा, उगाच बोलत बसतो
स्वप्न आणि रात्रीचा खेळ असाच चालू असतो

मी मात्र झोप येत नाही हा कांगावा करीत बसतो


उभा शिशिर अंगणात ,  निष्पर्ण वस्तीत रहातो 
न दिसे कोणी वळणावर , वाट कोणाची बघतो

स्वप्नांचा पडला पाचोळा , मी उगाच तुडवत बसतो


कोणती नक्षी त्या दगडावर , मातीला ओलावा असतो
उडून येते एक फुल कधी ,  मंद दिवा जळत असतो 

ठाऊक नसते कोणा , कबरीला पण सुगंध असतो


एक थेंब तुझ्यासाठी

०२ नोव्हेंबर २०१८

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...