Friday, November 9, 2018

त्याची कविता एक अलंकार आहे ...




त्याची कविता एक अलंकार आहे ...

मनाचे तुझ्या दार आता कशाला बंद आहे?
प्रेम नाही म्हणतेस,हा तुझा अहंकार आहे..

काही न बोलता हि तूला वाटते शहाणी आहेसं,
न बोलणारा तुझा अबोला बघ किती बोलका आहे.

आता कशाला पाहतेस आरसा पुन्हा पुन्हा
मनात तुझ्या माझेच प्रतिबिंब उमटले आहे

तुझ्या लेखी प्रेम एक केलेला उपकार आहे
तिरस्कार हाच मम मिळालेला पुरस्कार आहे,

लिहू काय मी अजून तुझ्यावर आता ?
कविताच माझा प्रेम अलंकार आहे ....

एक थेंब तुझ्यासाठी ...

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...