Thursday, August 3, 2017

बास करा धिंगाणा .. सोडा की मला आता






बास कर हा धिंगाणा .. थांब ना रे जरा
राहू किती उभी अशी जाऊदे ना मला ,

कोसळणारा तू , थांबशील कधी 
अधीर झाले मन, वाट पाहू किती 
काहीच कसे वाटेना, पावसा तुला  

बास कर हा धिंगाणा .. थांब ना रे जरा
राहू किती उभी अशी जाऊदे ना मला ,

सोड सखया बघ उशीर किती झाला
थांबलेला तो बघ पुन्हा बरसू लागला
सुरु करेल आता खेळ जुनाच आपुला

बास कर हा धिंगाणा .. थांब ना रे जरा
अडकले मी अशी जाऊदे ना मला

तुझा आणि पावसाचा खेळ सारा होतो
अडकतो श्वास माझा ,जीव ओला होतो
थांबवा की रे आता हा खेळ जीव घेणा ...


बास करा धिंगाणा .. सोडा की  मला आता

एक थेंब  तुझ्यासाठी

३ ऑगस्ट २०१७

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...