Sunday, February 5, 2017

बघ मग कशी बांधते पदरास सख्याला



गेले कुठे चांदणे माझे , दिसत नाही चंद्र ही आज काल
तरी ही ती रात्र रात्र जागते मोजत ढगांच्या सावल्या ..
गुणगुणते स्वतःशीच बापुडी  ...
येईल कधी तरी चंद्र लपण्यास अंगणात माझ्या ...

दिवस झाले मला पोरके , रात्र ही असते दूर  दूर
नसतो चंद्र माझा जवळ , हीच चांदणीची कुरकुर .
तक्रार माझी स्वप्नातही तो दिसत नाही
तरीच हल्ली डोळ्यातून रात्र काही सरत नाही ...

बघ लागले मी मोजू आता दिवस एक एक खास
एक एक दिवसाला बघ मी लावली ती कित्ती आस
येशीलच की सुट्टी लागता अमावस्येला .....

बघ मग कशी बांधते पदरास सख्याला

एक थेंब तुझ्यासाठी
०३/०२/२०१२

श्वासात स्वतःच्या माळते मी त्याला





येता  जाता त्याचाच विचार असतो,
नसेल दिसत तरी सोबत तोच असतो...
श्वासातून माळते मी त्याला ..

मनातील कोपर्यात जपून ठेवला असतो
प्रत्येक उसासा एक त्याचा पुकारा असतो
उर भरून पुन्हा साठवते त्याला ...

रोम रोमांतुनी माझ्या तोच सदा मोहरतो.
लोचने मिटता मंद शावासातुनी सुखावतो
हृदयाच्या ठोक्यात मोजते त्याला ..

काय झाले कळेना मला , नसला तो जवळी तरी
कणा कणातुनी सांभाळते मी त्याला

श्वासात स्वतःच्या माळते मी त्याला

एक थेंब तुझ्यासाठी
०५/०२/२०१२

पहाट गुलाबी बनून येईल का?


ते काळे आभाळ होते कि डोळ्यातील काजळ तीचे
नजरेच्या सुरईतून सांडलेले ,ते अमृत दव भासे.

तिला म्हणू मी अमृताची धार, कि मरुतल संजीवनी
लागली जरी ओठी माझ्या ,तृष्णा पुरी करेल का ?

मदहोश गंधात नाहलेली , गर्द धुक्यात लपेटलेली
ती कधी पहाट गुलाबी बनून येईल का?

एक थेंब तुझ्यासाठी
०५/०२/२०१४

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...