Friday, May 27, 2016

चंद्र जागतो रात्रभर



तिन्ही सांजेला कशी रे  येते तुझी आठवण
जशी चढते निशा , तशी चढते कणकण
पेटलेल्या गात्रात तळमळते ती जाणीव
हुरहूर , काहूर  मनी , होते घालमेल ……

त्यातच छळायला तो चंद्र जागतो  रात्रभर 

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय हो




आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय हो

थोडी मज्जा , थोडी सजा,
थोडे प्रेम, थोडा रुसवा
थोडे गोड, थोडे कडू ,
थोडा दुरावा , थोडा ओलावा
थोडी भांडणे , थोडी गोडी
थोड्या मागण्या, थोडी  पूर्तता
थोडी रुखरुख , थोडी जवळीक ,
थोड्या चिंता, थोड्या कटकटी,
घेता  दोन घोट थोडे थोडे , आठवते मज सारे
थोड्या थोड्या वेळानी थोडे  थोडे आयुष्य घडे

एक थेंब तुझ्यासाठी
27 May 2016

Sunday, May 22, 2016

पावसाची सुरुवात ……





पावसाची सुरुवात  ……

पावसात छत्रीत थेब एक टपकला होता
पाहून तुला तोही तसाच थांबला होता
मनोमनी जळलो पार मी पाहून त्याला
अधरांनि टिपले गालावरून त्याला

का तुला उगा वाटले अधीरपणा हा झाला....

चिंब ओल्या तनुवरती  तो उगाच रेंगाळला होता
ओघळू म्हणता म्हणता उग्गाच घुटमळला होता
पडली नजर सयाची त्यावर , कावराबावरा झाला
अधीरपणा हा अधरांचा मग थेंबाचा बळी गेला

धसमुसळे पणा नाहीतर काय म्हणू ह्याला........

उडून गेली केन्ह्वाच छत्री , चिंब मी पावसात,
बघ कसे टपोरे थेंब मला आता भिजवतात
करशील काय आता , सावर की रे स्वतःला
जातील उडून क्षणात सारे बांधून ठेव अधराना

दाहकता किती मिठीत तुझ्या ठावूक कोठे त्यांना....

एक थेंब तुझ्यासाठी …….
२२ मे २०१६ 

Sunday, May 8, 2016

सांग ना मला …….




 सांग ना  मला …….

बरसणारा पाउस माझा वैरी का असेना
हळव्या तुषारांचा भार असा का सोसेना
गरजणारी बिजली जणू पेटवे वणवा उरी
जावू कसे सामोरे ह्याला …. सांग ना मला …।

मोगरा , पारिजातक, चाफा का मज पटेना
सुगंध ह्यांचा जणू , लाही लाही मज वाटेना
कोवळा स्पर्श रोमरोमात फुलतो निखारा
चटका मी झेलू कसा . सांग ना मला …।

आवेग सरला मागे , गेली सुकून हि काया ,
मुक्या मनाला ,का न उमजे हि मुकी भाषा
लोचनांची भाषा तुला , कळूनी का वळेना
बोलू मी तुजशी कैसे     सांग ना मला …।

एक थेंब तुझ्यासाठी
०८ मे २०१६

Saturday, May 7, 2016

नाव तुझे पुसले कोणी , सांग ना मी काय सांगू



नाव तुझे  पुसले कोणी , सांग ना  मी काय सांगू

गोर्या गोर्या कांतीवर,फिरव कि नाजूक बोटे
येईल मग जो शहारा , उठेल जो तरंग ….
नाव माझे सांग सारंग, तो ,एक सारंग

इथेच कोठेतरी हरवली ती चाल आहे
इथेच कोठेतरी रुण झुणंनारा नाद आहे
तो ताल , ती रिमझिम साद घालते मला
नाव सांगते सारंग तुझे मला ,


रंगुनी येते निशा रंगात रंगुनी जाते निशा
कवडसा बघ एक कसा तनुवर रंगला आहे
निशब्द, निश्चल बघ कसा दंगला आहे
रंगात सारंगच्या एक थेंब थिजला आहे

एक थेंब तुझ्यासाठी
०७ मे २०१६

भिजवून कडा चिंब पापण्यांच्या ...


रात्रभर सये आसवांचा पाउस बरसून गेला
आठवणीचा खजिना उगाच हरवून गेला
जाग आली सकाळी त्या धुंद मृदुगंधाने
पेटलेल्या मातीला तसाच भिजवून गेला ......
पेटलेल्या मातीत श्वास थिजलेले
उश्वास काही अबोल मिटलेले
निपचित सारे कलेवर पडलेले
तो पुन्हा मुसळधार बरसून गेला
जाता जाता असा कोसळून का गेला
भिजवून कडा चिंब पापण्यांच्या
खळीत गालावरती टपकून गेला
जपून ठेवला मी माघारी तो
थेंब एक टपोरा मागे ठेवून गेला
एक थेंब तुझ्यासाठी
30 April 2016

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...