कधी उडवले होते तुझ्या बटांना ,कधी खेळलो होतो
नकळत तुझ्या मी त्यातच गुंतलो होतो...
कधी छेडून तरंग गहिर्या डोळ्यात, मी डोकावलो होतो,
नकळत तुझ्या मी त्यातच डुंबलो होतो..
कधी खेळून तुझ्या तनुशी, कधी सलगी करत होतो,
नकळत रोमा रोमात रोमांच आणत होतो
कधी येवूनी स्वप्नी तुझ्या, मी रात्र जागवत होतो,
नकळत तुझ्या मी स्वप्ने रंगवीत होतो,
कधी कोरून नक्षी आधारन्वरती, कधी चुंबित होतो,
नकळत तुझ्या मी मकरंद टिपत होतो,
कधी छेडूनी तार हृदयाची, ते प्रेम जागवत होतो,
नकळत तुझ्या मी ते स्पंदन होत होतो,
नकळत तुझ्या असे किती झाले आणि केले गुन्हे
मानुनी देव तुला मी माफी मागत होतो....
देवपण घेवून तू, दाखवा साऱ्या जगाला,
देवून टाक एकदा माफी माझ्या साऱ्या गुन्ह्यांना ,
माझ्या साऱ्या गुन्ह्यांना ...
एक थेंब तुझ्यासाठी
No comments:
Post a Comment