Tuesday, July 5, 2011

थेंब पावसाचे थेंब अश्रुंचे


थेंब पावसाचे थेंब अश्रुंचे 

थेंब थेंब पाऊस पडे ,                              थेंब थेंब अश्रूही गळे 
थेंब पावसाच टपोरा ,                            थेंब अश्रूंचा हि टपोरा
थेंब पावसाचा पडतो ,                           थेंब अश्रूंचा हि पडतो
थेंब पावसाचा ओला,                            थेंब अश्रूंचा हि ओला
थेंब पावसाचा भिजवितो,                     थेंब अश्रूंचा हि भिजवितो 
थेंब पावसाचा जाणीव सुखाची              थेंब अश्रूंचा उणीव सुखाची 
थेंब पावसाचा करी मन वेडे                   थेंब अश्रूंचा वेड्या मनातून घडे 
थेंब पावसाचा जाणीव कंपनांची             थेंब अश्रूंचा जाणीव स्पंदनांची 
थेंब  पावसाचा पडतो काळ्या नभातून    थेंब अश्रूंचा पडतो काळ्याभोर नेत्रातून

चिंब चिंब पावसात भिजताना, सांग अश्रू कसे ओळखशील ?
कंपने आणि स्पंदने सांग वेगळी कशी करशील?

सोप्पे आहे उत्तर ह्याचे....बघ तुला कळते का?


एक थेंब तुझ्यासाठी 

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...