हे असे का होते सांग ना?
ओढून घेतलास तू पदर झाकलेस यौवनाला
तरीही तो चंद्र वेडा का लाजतो सांग ना?
मिटलेस तू डोळे, लपविलीस सारी स्वप्ने त्यात
तरीही तो निशिगंध वेडा रात्री फुलतो कसा सांग ना?
हलकेच चावून ओठ, दाबलास तू विचार त्यातुनी
तरीही तो केवडा वेडा एवढा गंधित का सांग ना?
झोपलीस तू रात्री निशब्ध, न बदलूनी कुसही
तरीही पहाटे पारिजातक कसा फुलला सांग ना?
भाव लपवण्यासाठी झाकतेस चेहरा दोन्ही हातानी ,
तरीही तो झरा वेडा अवखळ पणे का धावतो सांग ना?
काढून टाकलास तू गजरा, सोडवायला केस मोकळे
तरीही तगरीच्या फुलाला गंध मोगार्यचा कसा सांग ना ?
हलकेच उठून तू सकाळी, गेलीस निघुनी दूर,
शब्द माझे संपले, संपला प्रवास, सोडून गेला प्राण,
तरीही वेड्या मनात हि धुगधुगी कशी सांग ना?
हे असे का होते सांग ना?
महेश उकिडवे
2 comments:
हे असे होते कारण प्रीत माझी खरी असे
परी चौकटीच्या बंधात मी बांधली असे
मिटले जरी मी डोळे स्वप्नांना ती जाग असे
हृदयात ती तुझ्या म्हणुनी निशिगंध दरवळे
विचार मी दडपला तरीही भावना मनी वसे
केवड्याच्या आत ती सुगंधी केतकी जन्म घेतसे
निशब्द माझी झोप रे लोचानातुनी बोलते
फुलता पारिजात तो भाषा नयनाची सांगतसे
झाकला चेहरा जरी मी अंतरी ती ज्योत रे
तेज त्यातले घेउनी हा झरा वाहतसे
काढला गजरा जरी मी केस झाले मोकळे
त्या तुझ्या तगरीवरी मी श्वास माझे शिंपले
गेले मी दूर जरीही म्हणतोस प्राण तुझे संपले
अजून धुगधुगी वाहतसे कारण मी तुझ्यात प्राण माझे फुंकले
अनुजा (स्वप्नजा)
just amazing.. poem and comment both!! and v romantic .. i must say!!
Post a Comment