Saturday, February 6, 2010

सांग मला कसे पेलतेस तू सजणे


माझ्या लग्नाचा ८ तारखेला वाढदिवस आहे, नेहमी प्रमाणे मी या वर्षी सुद्धा कुठेतरी बाहेरच आहे
चला म्हटले काहीतरी फोन वर बोलून, किंवा त्याच त्या भेटवस्तू पाठवून कंटाळलो आहे
थोडे काहीतरी वेगळे करावे....म्हणून मग हे लिहिले......माझ्या बायकोसाठी.......:-)



नाजूक बोटांनी तुझ्या तू बटाना सावरतेस,
हळुवारपणे पापण्यांमध्ये स्वप्ने मिटून घेतेस.

मुद्दामून तुझे हे असे सहज  बाहेर पडणे
जणू संध्याकाळच्या नभालाही लाजवणे

कळीलाही लाजवेल असे हे तुझे हसणे
गालावरती खळ्या नव्हे जणू पाकळ्या सांडणे

वार्यालाही क्षण  भर रोखेल असे तुझे बघणे
मिटताच डोळे, सारा आसमंत लपेटणे

सुंदर तुझी हि काया, जणू स्वर्गातील अप्सराच तू
मोहक असे हे ओठ कि जणू मद्याचा प्यालाच तू

असे हे नशिले, सहज आणि मोकळे  सौंदर्य तुझे
सांग मला कसे पेलतेस, तू सजणे.....सांग मला कसे पेलतेस तू सजणे

महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...