Thursday, February 4, 2010

माझ्या मनाला ओले चिंब करून गेला पाउस आज


काही विशेष नाही, आज सिडनी मध्ये बसलो आहे, बाहेर जोरदार पाऊस कोसळतो आहे.
आणि तिचा मेसेज आला कि ती आठवण काढून माझी रडत आहे भारत मधे........म्हणून मग तिच्या साठी काहीतरी लिहावेसे वाटले इतकेच.....................................................

माझ्या मनाला ओले चिंब करून गेला पाउस आज
काल रात्रीही स्वप्नात आली होतीस पाउस होऊन....

रात्रभर केलेला धिंगाणा तुझा , आणि केलेली मस्ती
सांगत होता पाऊस मला ,येवून माझ्या दारी

असेच भिजत होतो रात्र भर मी तुझ्यात
माहित नाही पावसाचे ते  थेंब होते कि  तुझे अश्रू.

आशीच बरसात राहिलीस तर काय सांगावे
होईन मीही असाच धुंध, आयुष्यभर 

फक्त फरक एवढाच होईल कि वर्षाचे बारा महिने 
पाऊस पाऊस आणि पाऊस होईल.

महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...