खेळू देत मला रंगपंचमी तुझ्याशी
रंगून जाईन तुझ्या नेत्री रंग निशेचा होऊनी
रंगून जाईन तुझ्या ओठी रंग गुलाबी बनुनी
रंग घेऊन पाहाटेचे रंगवीन तुझी स्वप्ने
रंग होऊनि रक्तिमेचा रंगवीन तुझ्या गालाना
रंग होऊनि केशरी पुजीन जीवनी तुला
धरतो आस मनी नेहमीच आशी रंगपंचमी व्हावी.
झालोच मी जर कान्हा ...तुच माझी राधा व्हावी
ज्ञानोबाच्या, ना तुक्याच्या वंशाचा मी, ना गदिमा, बोरकर, खानोलकर, कुसुमाग्रजांच्या जातीतला मी, ना मी पुलं, शन्ना, वपू च्या पंथातला मी, ना मी गुरु, संदीप च्या जात्कुळातील मी, मग मी कोण? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून लिखाण करणार आहे. सदर ब्लॉग हा, कॅपिटल मार्केट, आर्थ-शास्त्र , मानवी संबंध ह्याला समर्पित असेल.
Sunday, February 28, 2010
Saturday, February 6, 2010
सांग मला कसे पेलतेस तू सजणे
माझ्या लग्नाचा ८ तारखेला वाढदिवस आहे, नेहमी प्रमाणे मी या वर्षी सुद्धा कुठेतरी बाहेरच आहे
चला म्हटले काहीतरी फोन वर बोलून, किंवा त्याच त्या भेटवस्तू पाठवून कंटाळलो आहे
थोडे काहीतरी वेगळे करावे....म्हणून मग हे लिहिले......माझ्या बायकोसाठी.......:-)
नाजूक बोटांनी तुझ्या तू बटाना सावरतेस,
हळुवारपणे पापण्यांमध्ये स्वप्ने मिटून घेतेस.
मुद्दामून तुझे हे असे सहज बाहेर पडणे
जणू संध्याकाळच्या नभालाही लाजवणे
कळीलाही लाजवेल असे हे तुझे हसणे
गालावरती खळ्या नव्हे जणू पाकळ्या सांडणे
वार्यालाही क्षण भर रोखेल असे तुझे बघणे
मिटताच डोळे, सारा आसमंत लपेटणे
सुंदर तुझी हि काया, जणू स्वर्गातील अप्सराच तू
मोहक असे हे ओठ कि जणू मद्याचा प्यालाच तू
असे हे नशिले, सहज आणि मोकळे सौंदर्य तुझे
सांग मला कसे पेलतेस, तू सजणे.....सांग मला कसे पेलतेस तू सजणे
महेश उकिडवे
Thursday, February 4, 2010
माझ्या मनाला ओले चिंब करून गेला पाउस आज
काही विशेष नाही, आज सिडनी मध्ये बसलो आहे, बाहेर जोरदार पाऊस कोसळतो आहे.
आणि तिचा मेसेज आला कि ती आठवण काढून माझी रडत आहे भारत मधे........म्हणून मग तिच्या साठी काहीतरी लिहावेसे वाटले इतकेच.....................................................
माझ्या मनाला ओले चिंब करून गेला पाउस आज
काल रात्रीही स्वप्नात आली होतीस पाउस होऊन....
रात्रभर केलेला धिंगाणा तुझा , आणि केलेली मस्ती
सांगत होता पाऊस मला ,येवून माझ्या दारी
असेच भिजत होतो रात्र भर मी तुझ्यात
माहित नाही पावसाचे ते थेंब होते कि तुझे अश्रू.
आशीच बरसात राहिलीस तर काय सांगावे
होईन मीही असाच धुंध, आयुष्यभर
फक्त फरक एवढाच होईल कि वर्षाचे बारा महिने
पाऊस पाऊस आणि पाऊस होईल.
महेश उकिडवे
Subscribe to:
Posts (Atom)
मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार
मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी शोधीत होती , भरकटलेल्या वादळात मिळेल का मला एक हळवे बेट प्रश्नांच...
-
चिंब चिंब भिजताना .... ओले ओले चिंब कपडे, ओले चिंब मन होत होते ओले होते स्वप्न सारे , ओल्या ओल्या पावसातले ओल्या हातात माझ्या तुझा ...
-
मोकळे केस तुझे............ मोकळे सोडून केस , वर तुझे हे असे वागणे जणू मोगार्यालाही वेडावून असे खुले धुंध सोडणे मोकळे सोडून केस, वर तुझे...
-
रांगोळी रंगारी तू माझा , सावळा रंगारी रंग तुझा लेवून सजले मी अंतरी रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...