Sunday, January 24, 2010

अजून काही त्रिवेणी

त्रिवेणी


तू मला नेहमी खोटारडा म्हणायचीस,

लोकांनी नाव दिले आज मला कवी


माझी ओळख मला इतक्या वर्षांनी झाली

________________________________________

काटेरी तारांवर कोणीतरी ओले कपडे वाळत घातलेले

थेंब थेंब रक्त सांडत होते त्यातून,


हल्ली म्हणे ती रोज त्याची आठवण काढते
_______________________________________

असे बरेच वेळेला होते, कि गोष्ट चांगली असते,

कधी खिशात पैसे नसतात, तर कधी दुकान बंद



असेच एकदा तुला मी विचारले होते माझ्या बद्दल
________________________________________

तुझ्या बरोबर पाहिलेली स्वप्ने,

प्रत्यक्षात कधीच खरी झाली नाहीत


नाही नाही, स्वप्ने निवडण्यात माझीच चूक झाली होती.
______________________________________

उधार ठेव माझे आयुष्य तुझ्या कडे

थोडे श्वास आणखी मागून आणतो


सावकारी मृत्यू साला व्याज त्यावर पण वाढवून मागतो
_______________________________________

झाली सकाळ तरी अजून चंद्र आकाशात घुटमळतोय

आकाश पण थोडं बावरून गेलंय, सूर्य हि फिका पडलाय


तू स्वप्नातून जागी हो ना प्लीज
____________________________________

श्वास गुंफून धुंध करशील का मला, स्पर्शाने तुझ्या मोहित करशील का मला

येवून जवळ घेशील का मिठीत मला, असे अनेक प्रश्न मनी माझ्या


होवून विश्वामित्र, संकटांची वाट रोजच बघतो मी........
___________________________________________________

रडवायला मला तुझ्या आठवणी आल्या

रात्र जागवायला पुन्हा पुन्हा आल्या


परीक्षा माझ्या अश्रूंची कि मनाची घेतेस तू?
_______________________________________________

आज पुन्हा एकदा त्या बगिच्या जवळून गेलो

जुनी आठवण परत आली,


काही नाही काही फुल आजही तशीच टवटवीत आहेत
______________________________________________

खूप सांभाळून ठेवले होते मी थोडेसे अश्रू

एक छोट्याश्या गोष्टी करिता सगळे वाहून गेले



आता रोज रोज नव्या जखमा कुठून आणू.
__________________________________________

फिरवून तक पाणी सार्या आयुष्य्वारुनी

लिहीन मी हि सारे नवीन पुन्हा एकदा


परत परत तुझेच नाव लिहायला कष्ट थोडे पडतात
__________________________________________

छत्री लपवून भिजत राहिलो आज दिवसभर

तोही बरसत होता बेहोष होवून


मग कळले तू त्याच्या बरोबर होतीस
_________________________________

वाद घालण्या एकमेकांशी पुन्हा दोन विचार आले

एकच होते भाव त्यांचे, विचार मात्र वेगळे होते


जो हरेल आज त्यात तोच तर जिंकेल

__________________________________________

रडतो आज काल मी खूप वेळा

केलेल्या प्रत्येक चुकीला बोल लावतो



जखमा साफ करताना वेदना तर होणारच ना?

__________________________________________

आठवणी काही रंगीत तर काही गंधित तुझ्या

विस्कटून सार्या पुन्हा पुन्हा एकत्र करतो मी



प्रेम मी केलं तुझ्यावर म्हणून तू काहीही मागू नकोस माझ्या कडे

______________________________________________



डोळे अगदी टच्च भरून वाहायला तयार आहेत

एक एक अश्रू मी सांभाळून ठेवला आहे



तू ये एकदा पुन्हा कधीतरी, मोकळे होवूदेत मला

______________________________________________



काल पहिले तुला रात्रभर तळमळताना

कूस बदलून झोपायची तुला सवय नाही



तू प्रेमात आहेस का कोणाच्या तरी?

__________________________________________

1 comment:

Unknown said...

I liked -

डोळे अगदी टच्च भरून वाहायला तयार आहेत

एक एक अश्रू मी सांभाळून ठेवला आहे



तू ये एकदा पुन्हा कधीतरी, मोकळे होवूदेत मला

---------------------------------

तुझ्या बरोबर पाहिलेली स्वप्ने,

प्रत्यक्षात कधीच खरी झाली नाहीत


नाही नाही, स्वप्ने निवडण्यात माझीच चूक झाली होती.

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...