Wednesday, January 10, 2018

तो घाव गहिरा पण सुगंधी होता .......





तो घाव गहिरा पण सुगंधी होता .......


पौर्णिमेचा चंद्र वेडा , अंगणी माझ्या आला होता

रातराणी चा सुगंध , आसमंती दरवळला  होता

मदहोष  मामला सारा , हाय स्पर्श तुझा धुंद होता


मिटलेल्या डोळ्यात तिच्या , मुक्या आठवणी होत्या

मोहक स्पर्शात त्याच्या , चिंबओल्या भावना होत्या

उरलेले सारे व्यर्थ होते ...त्याला रजनी ऐसे नाव होते


गुंफलेल्या बाहुपाशात , विळखा अधरांचा होता, 

घायाळ झाले मन  , दंश सखयाने केला होता 

उमजले कुठे मला तो घाव गहिरा पण सुगंधी होता 


तो घाव गहिरा पण सुगंधी होता .......

एक थेंब तुझ्यासाठी
१० जानेवारी  २०१८

नजरे समोरूनी ......




नजरे समोरूनी ......

नजरे समोरूनी तुझ्या, घेऊन एक वळसा
गेली कशी निघोनी तुला न कळता
उमजून आता करणार काय
उडून गेलेल्या  क्षणांना कसे  थांबवणार ...

येतो कंठ भरुनी , त्या आठवणींचा ...
ओघळला थेंब एक अंतरीचा ...
अंतर हे दोघातील लांबलेले
तुझ्या वीना माझे जीवनच थांबलेले.......

एक थेंब तुझ्यासाठी
१० जानेवारी २०१८

Monday, January 8, 2018

रंग डोळ्याचा गहिरा झाला ..........



ती :
ठेवू कुठे लपवूनी तुला,तू असा लपणार नाही,
ठरवीन मनाशी तरी ,ओढ अशी संपणार नाही,
चुगलीखोर डोळे माझे ,चहाडी करतील कधीतरी,
गालावरच्या खळीत,लाजून हसू फुटेल कधीतरी,

सांग मी कोंडू कशी ह्या प्रेमळ अनुभूतीला,
भावनांना असे कोंडणे मला जमणार नाही,
नसलास जरी साजणा आज तू जवळी,
भाव विश्वात माझ्या तुझ्यावीण कोणीच नाही...

तो:
लावून काजळ सांग खुलतो का कधी रंग डोळ्यांचा असा
आला बघ नयनी तो , सांग सखे आता टिपणार कसा?
मिटून घे पापण्या घट्ट, ठेव तसाच बांधून त्याला
मग हलकेच उघड नयन दाखव साऱ्या जगाला
काळ्या काजळाने नाही, ओल्या पापण्यांमुळे
रंग डोळ्याचा गहिरा झाला ..........

एक थेंब तुझ्यासाठी
०८ जानेवारी २०१८

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...