Tuesday, September 19, 2017

सावन ऋतू आई सजनीया




परतून पुन्हा आला, भिजवण्या मला साजण माझा

असे दिन कि असे रात्र कळेना मला , नभी असा काळोख दाटला
वयाचा ना वाटे मला भरोसा , चुकली का वेळ संशय मनी दाटला
उलटला श्रावण तरी हा थबकलेला, सुटला तोल मग दोष कुणाला

करू काय आता प्रमाद हा झाला , भिजून गेले पुरती प्रेमात त्याच्या
भान नसे माझेच मला , चिंब ओली मी झाले , तरी हा परतोनी आला
बहाण्याने कुठल्या रेंगाळला हरी माझा , कोसळला का असा कळेना मला

अश्विनात म्हणू कशी , सावन ऋतू आई सजनीया

एक थेंब तुझ्यासाठी

१९ सप्टेंबर २०१७

Thursday, September 14, 2017

मकरंद होताना ......


पहिले तुला उमलताना ,लाजून चूर चूर होताना
ओघळणारे थेंब इवले पानावर दवबिंदू होताना
वाऱ्याच्या हलक्या स्पर्शाने कळीचे फुल होताना

बहाण्याने संध्येच्या, तू अधर मिटून घेताना,
का लाजलीस  सखे, तो भुंगा रुंजी घालताना
बावरला बघ किती तो, तुझ्या मिठीत शिरताना

रात्र सारी गेली मिठीत तुझ्या, पहाट होताना
कुशीत तुझ्या पहिले स्वप्न, झुंजूमुंजू होताना,
देवू नकोस आळस आता, मी असा निघताना

जावू नको का मी येथून मनात माझ्या नसताना
होवून भ्रमर येवू का मी, कळीचे फुल होताना
टिपण्या ओठांवरचे दवबिंदू , मकरंद होताना

मकरंद होताना ......

एक थेंब तुझ्यासाठी

Thursday, September 7, 2017

रंग नभाचा





रंग नभाचा

मी रंग नभाचा तू तर सांज सावळी
घेशील का मिठीत मजला
रंगुदे क्षितीजावरी नक्षी आगळी ....

गोड गुलाबी पहाटे, दव बिंदूच्या साथीने
गुंफितो तुला स्वप्नी, नाजूक रेशमी धाग्यांनी ,
सुटेल कसा हा गुंता ? सांग आता साजणी…

तुझ्या पासून सुरु, तुझ्या पर्यंत माझा
भावनांचा मन-मोहक, पिसारा असा
शिंपल्यातील गवसलेला मोती तू जसा

खळखळ वाहणाऱ्या झऱ्याचा नाद तू
अल्लड अवखळ वाऱ्यांची  झुळूक तू
बेभान आठवणींचा , तू एक किनारा

मी रंग नभाचा तू तर सांज सावळी
घेशील का मिठीत मजला
रंगुदे क्षितीजावरी नक्षी आगळी ....


एक थेंब  तुझ्यासाठी
०७ सप्टेंबर २०१४

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...