Friday, September 26, 2014

तू दिलेला प्रेमाचा तुकडा


तू दिलेला प्रेमाचा तुकडा तसाच पडून आहे
लावून हात त्याला मी जखमी कशास होवू
कारण रुधीराला व्यक्त होण्याचे मी का देवू ?

तू दिलेला शब्द नी शब्द मी जपून ठेवला आहे
का ते शब्द बोलत नाही उमगे न मला हे कोडे
मौनात सारे अर्थ दडलेले ,मौन बिचारे झाले वेडे

एक कवडसा  माझ्या अंगणातला कातरलेला
आठवते का स्पर्शून गेला होता तुला कधीतरी
थडग्यावर आहे तसाच तो सुकलेल्या पानापरी

अचानक आवाज पाचोळा पानांचा येत आहे
जपून चाल सये सांभाळ ग स्वतःला जरासे
तू दिलेला प्रेमाचा तुकडा तिथेच पडून आहे
तिथेच कुठेतरी पडून आहे ………

एक थेंब तुझ्यासाठी
२६ /०९/२०१४

Wednesday, September 17, 2014

दव बिंदूचा सडा


शब्द अडखळले ओठात ,भावना कोंडल्या मनात,
दाटला स्वर कंठात, पापण्यात थिजला कटाक्ष
होते मोकळे अश्रु… वाहिले पुरात …
सांडले होते काही मखमली तृणान वरती
पावला गणिक जाणवला तो ओलावा
वाचली मी कविता त्याची
उमगले मला … तो नव्हता
दव बिंदूचा सडा
तो नव्हता …. दव बिंदूचा सडा

एक थेंब तुझ्यासाठी
१७ /०९/२०१४

Tuesday, September 9, 2014

एक तुळशी माळ आहे.



पाहिलेले स्वप्न आताशा लोप पावत आहे
जातो मी तीथे तुझी आठवण सोबत आहे

वर करी जरी भासे पाषाण कोरडा आहे
उराशी निर्झर ओला तसाच वाहत आहे

जरी वाटे भोवताली ते चित्र मनोहर आहे
रंगुनी सार्या रंगात,तो कोपरा धवल आहे

व्यक्त माझे मन अन शब्द अनमोल आहे
सांगू कसे कोणाला तो भाव अबोल आहे

वाटले जरी कोणास मनमोहक सुगंधी आहे
गुंफिलेल्या आठवणींची एक तुळशी माळ आहे

एक थेंब तुझ्यासाठी

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...