Thursday, November 28, 2013

कबरीला हि सुगंध असतो .....


घेवून उशाशी मोगरा तू अशी निजलीस का
जाळून आठवणीना तू अशी थिजलिस का

स्वप्नात रंगुनी रातराणी कोमेजलीस का
तरीही जहालेल्या चुकांना माळतेस  का?

उगीच जुन्या जखमांना तू कुरवाळतेस का
रुतून बसलेल्या खुणांना उरात सांभाळतेस का

कबरीवरच्या मातीला सुगंध असतो
बघ तुला पटते का?


एक थेंब तुझ्यासाठी
29 NOV 2013 

Tuesday, November 26, 2013

सांग सये ते देशील का?



मौनात तुझ्या मी अर्थ शोधलेले
ओठांवरती तुझ्या मी कोरलेले
सांग सये ते
बोल काही देशील का ?

हलकेच तेन्ह्वा सापडलेले
वाहताना लोचनी मी टिपलेले
सांग सये  ते
मोती मला देशील का?

धुंध प्रीतीने  मन बावरलेले
गंध होवून तुला बिलगलेले
सांग सये  ते
अत्तर मला देशील का ?

आभाळ सारे कोसळलेले
हलकेच तनुस बिलगलेले
सांग सये ते
थेंब  मला देशील का ?

सांग सये ते देशील का?
सांग सये ते देशील का?

एक थेंब तुझ्यासाठी
२७ नोव्हेंबर २०१३


निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा

रोज रोज का असे श्वासांचा पहारा
रोम रोमातुनी उठे हा नवीन शहारा
कातर वेळीस का हा फुलतो निखारा
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा

थकलो मी उगाळून संयमाचे वेढे
देवून जाहले उसने अवसान काढे
सोडून उसासे मोजले रोजचेच पाढे
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा ….

सुगंधी स्वप्नाची नशा मैफिलीला
गुंतनार्या बटांची साथ सोबतीला
उधळतो मग मोगरा संगतीला
निरखुनि बघता तुला ,किनारा किनारा ….

एक थेंब तुझ्यासाठी
२७  नोव्हेंबर २०१३ 

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...