Sunday, February 27, 2011

मद्याला हल्ली मी ना भुलू लागलो


जाता जाता पहिले तुला अन चढली ती नशा,
तू गेल्यावरही, उतरते कुठली, अजूनच मुरली ती नशा.....

लोक म्हणती कधी मोजतो हा पायऱ्या माडीच्या 
लोक म्हणती हा रुळतो हल्ली पायरी मद्यालयाच्या

केले पेलेच्या पेले रिकामे,रिचवले मी किती प्याले , 
वारांगनेच्या उंबरठ्यावरी गेले, त्या नंतर दिवस सारे, 

पहिले जावून भजनाला, देव पूजेला आणि यात्रेला 
पहिल्या ओढून माळा, पहिला करून धूप, दीप अन अंगारा.

कळेना लोक एवढे खोटे कधी झाले, खरे काय ते बघण्यासाठी 
मादिरालये, माड्या, देव, देवळे, सगळे माझे करून झाले 

दिसलीस तू त्या दिवशी पुन्हा, हाय खाडकन उतरली नशा 
आता मला कळाले, इतके दिवस केले ते अरे उपाय व्यर्थ गेले

लोक म्हणू लागले कि त्या दिवसा नंतर मी निरीश्वर झालो ,  
लोक म्हणे कि कुठल्याच मद्याला हल्ली मी ना भुलू लागलो ,  

महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...