कितीदा तुला आपलेसे करावे
आणि
कितीदा तू मला दूर करावेस
ह्याचा हिशोब न मांडतो ..
.मी फक्त प्रेम करत राहतो ...
चांदणे येते सांडून जाते, तो चंद्रही मला वेडावून पाहतो
पाठवून वैशाख वणवा मला पेटवू पाहतो
कोणास फिकीर झोळीत माझ्या चांदणे कि वैशाख निखारे
मी फक्त आणि फक्त प्रेम करत राहतो
कधी फुलतो अंगणात माझ्या केवडा सुगंधी
कधी फुलतो धोतराही विषारी ....
नाही परवा मजला , कोण फुलून मला धुन्धीत आणतो
मी फक्त आणि फक्त प्रेम करत राहतो
ती माळते गजरा कधी, तर कधी वेणीतुनी फुले सांडते
लावून भाळी कुंकवाचा टिळा मी ना तुझी हे दाखवू पाहते
नाही परवा मजला त्या कुंकवाच्या टीळ्याची, ना तिच्या त्या मिरवण्याची
होवून सौभाग्य तिचे मी तिच्या मनी सदा राहतो
मी फक्त आणि फक्त प्रेम करत राहतो
येता तो एक क्षण वेडा , ती हि बावरून जाते
खरे काय आणि खोटे काय हे शोधू पाहते
भाळीच्या कुंकवाला आपलेसे मानू पाहते
हाय पण काय तिचे नशीब हे ...
हलकेच श्वासातून तिच्या ,नाव माझे गुंफून जाते.
मी हे सगळे पाहतो ..हळूच तिच्या श्वासासंगे
हृदयात तिच्या उतरून ..............तीला सांगतो
मी फक्त आणि फक्त प्रेम करत राहतो
श्वासात तुझ्या राहू पाहतो
महेश उकिडवे
No comments:
Post a Comment