Thursday, January 27, 2011

एकदा मला गंधित करावे ....


एकदा मला गंधित करावे .....

सोडता अंबाडा केसांचा तिने, त्या गजर्या  मधून सांडली काही फुले 
चुरगळंलेल्या  काही पाकळ्या, आणि  धुंध झालेली काही स्वप्ने,
धावले वेडे मन वेचायला काही पाकळ्या अन काहीं स्वप्ने
कळेना मला वेचू कसे मी  मन अजूनही त्या मोकळ्या केसात गुरफटलेले 

वरती ती म्हणे असे कि ...मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
वेचून एक एक पाकळी ती , गजर्याला पुन्हा त्या धुंध करावे.
कुठे हरवली रे, देशील का तू  शोधूनि ती सारी स्वप्ने , 

वाट तुझी पाहुनी, रात्र रात्र जागते मी सोडते अंबाडा कितीदा, 
एकदा तरी तू स्वप्नांमधुनी येवून हलकेच मला कवेत घ्यावे
कुस्कारुनी ती फुले सारी , एकदा मला गंधित करावे ......

महेश उकिडवे




Sunday, January 23, 2011

मी फक्त प्रेम करत राहतो ...


कितीदा तुला आपलेसे करावे
 आणि 
कितीदा तू मला दूर करावेस
ह्याचा हिशोब न मांडतो ..
.मी फक्त प्रेम करत राहतो ...

चांदणे येते  सांडून जाते, तो चंद्रही मला वेडावून पाहतो 
पाठवून वैशाख वणवा मला पेटवू पाहतो 
कोणास फिकीर झोळीत माझ्या चांदणे कि वैशाख निखारे
मी फक्त आणि फक्त प्रेम करत राहतो

कधी फुलतो अंगणात माझ्या केवडा सुगंधी
कधी फुलतो धोतराही  विषारी ....
नाही परवा मजला , कोण फुलून मला धुन्धीत आणतो
मी फक्त आणि फक्त प्रेम करत राहतो

ती माळते गजरा कधी, तर कधी वेणीतुनी फुले सांडते
लावून भाळी  कुंकवाचा टिळा मी ना तुझी हे दाखवू पाहते
नाही परवा मजला त्या कुंकवाच्या टीळ्याची, ना तिच्या त्या मिरवण्याची
होवून सौभाग्य तिचे मी तिच्या मनी सदा राहतो
मी फक्त आणि फक्त प्रेम करत राहतो

येता तो एक क्षण वेडा , ती हि बावरून जाते 
खरे काय आणि खोटे काय हे शोधू पाहते
भाळीच्या कुंकवाला आपलेसे मानू पाहते
हाय पण काय तिचे नशीब हे ...
हलकेच श्वासातून तिच्या ,नाव माझे गुंफून जाते.

मी हे सगळे पाहतो ..हळूच तिच्या श्वासासंगे 
हृदयात तिच्या उतरून ..............तीला सांगतो
मी फक्त आणि फक्त प्रेम करत राहतो
श्वासात तुझ्या राहू पाहतो 

महेश उकिडवे


 








Thursday, January 13, 2011

आपला मनोमन आभारी आहे

मागच्या वर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मी हा ब्लॉग चालू केला होता. आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या एक वर्षात खूप जननी ह्या ब्लॉग ला भेट दिली. अनेकांनी कौतुक केले काही जणांनी नाके मुरडली. काही जणांनी नवे सुद्द्धा ठेवली. 

गेला वर्ष भर ज्या  कविता मला सुचल्या त्या सगळ्या मी ह्या ब्लॉग वर टाकल्या. या वर्ष पासून अर्थ -शास्त्र ह्या विषयी काही जुजबी तर काही विचार करायला लावणारी माहिती टाकणार आहे.

अर्थ शास्त्र तसा बघितला तर आतिशय रुक्ष असा विषय.  बर्याच जणांना त्यातला अर्थ कळतो पण शास्त्र समजून घेता येत नाही , काही जणांना ते समजून घेण्याची इत्चा पण नसते. करणे काहीही असोत. ह्या विषयाला जेवढे वलय प्राप्त आहे त्या मानाने ह्या वर लिहिणारे आणि बोलणारे तसे कमीच. दुर्दैवाने आपल्या मातृ भाषेत (मराठी) मध्ये तर अगदीच कमी.

चला आता एक वर्ष भर तरी नव नवीन काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

गेल्या वर्षभरात आपण दिलेल्या सहकार्य बद्दल आणि प्रतिसाद बद्दल आपला मनोमन आभारी आहे.

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...