Tuesday, March 18, 2025

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी 

नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी 

शोधीत होती , भरकटलेल्या वादळात 

मिळेल का मला एक हळवे बेट 


प्रश्नांचा भडीमार, अस्वस्थता ,लाचार 

तरीही तिने सांभाळला घर दार संसार 

ऐकली चाहूल तिने छोट्याश्या परीची 

ग्रीष्मात बरसली जणू मृगाची  सरी 



पहाटेच्या गोडं स्वप्नाला लागले ग्रहण 

येता जाता नशिबी दुःखाची गिरण 

भेटला त्यात एक सहज ओलावा तिला 

मोरपंखांचा सडाच जणू अंगी भुलावा 


वाटले तिला सापडले मज हळवे बेट 

विसरेन दुःखे सारी , निजे पळभरी थेट 


काय हे कर्म पुन्हा एकदा आला प्रसंग बाका 

ह्यावेळी होता तिला आधार हळव्या बेटाचा 

विसरली क्षणात सारे दुःख , टेकली निवांत 

हळव्या बेटाच्या साथीने , घेतला उश्वास 


भेटला तिला एक गोडं राजकुमार 

नकळत रंगवली स्वप्ने तिने चार 

वाटले बेटाला ठाऊक असेल खास 

त्याच्याच कुशीतुन जाहला होता भास 


तिने धरिली वाट त्या गुलाबी स्वप्नांची 

मोगऱ्याच्या गंधावर मोहरली जराशी 

जपलेल्या मोरपिसाला ,लाली कशाची 


मोहरलेल्या मोरपंखांची कहाणी तिची 

धावली मागे सांगायला एकदाची 


पण हाय रे घात झाला , जिव्हाळाच्या बेटाला 

गिळायला , त्याच्याच चुकांचा समुद्र आला 

तिचे बेट बुडाले होते , स्वतःच्या कोशात पार 


कोमेजले होते मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार 


18 March 2025

Wednesday, March 12, 2025

होलिका माझी प्रेमिका ...

 



होलिका माझी प्रेमिका 


टाकं जाळुनी  अहं माझा , होऊनि होलिका 

होवूदेत भसम्म , तुझ्या पायी मी पणा  माझा  


होऊनि पवित्र राख पायी तुझ्या पडायचे आहे 

शिव शंभोच्या भाळी , मजला सजायचे आहे 


सांग सये करशील का उपकार एवढा मजवरी 

ह्या होळीला घे सामावून मजला  तुझ्या अंतरी 



एक थेंब तुझ्यासाठी 

०३/१२/२०२५

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...