ठाऊक नसते कोणा
भेटतो आपण कितीदा, उगाच बोलत बसतो
स्वप्न आणि रात्रीचा खेळ असाच चालू असतो
मी मात्र झोप येत नाही हा कांगावा करीत बसतो
उभा शिशिर अंगणात , निष्पर्ण वस्तीत रहातो
न दिसे कोणी वळणावर , वाट कोणाची बघतो
स्वप्नांचा पडला पाचोळा , मी उगाच तुडवत बसतो
कोणती नक्षी त्या दगडावर , मातीला ओलावा असतो
उडून येते एक फुल कधी , मंद दिवा जळत असतो
ठाऊक नसते कोणा , कबरीला पण सुगंध असतो
एक थेंब तुझ्यासाठी
०२ नोव्हेंबर २०१८