Friday, December 23, 2016

जगावे असे

तुला मिळवावे हि आकांशा नाही
भोगावे तुला हि अंतरी इच्छा नाही
तुला स्पर्श व्हावा प्राजक्ता सारखा
सुगंध दरवळावा रातराणी सारखा

जगावे असे ... पुनर्जन्म मिळाल्या सारखा

तुझ्या मिठीत सख्या  , श्वासांचा स्पर्श व्हावा
जीवन मरणातला फरक , हलकेच दूर व्हावा
जादू करावी मग त्या धुंद क्षणांनी अशी जणू
मधहोष मनाने तोल माझा सुटावा

मग जगावे असे .. जणू पुनर्जन्म मिळावा

एक थेंब तुझ्यासाठी
२३ डिसेंबर २०१६

Thursday, December 1, 2016

छंद न्यारा पावसाचा तिला एकटी करून गेला



बहर काय कमी होता दारी प्राजक्ताचा ,
तरी सयेने भेट धाडली,
सदा पावसात नाहणारा मी ,
ती डोळ्यांच्या कडा धावून आली,
अंगणी माझ्या आला होता चंद्र वेडा त्या रात्री....
वरती ढगात मात्र पावसाची बरसात होती....

ती अशी मिठीत भिजलेली ,
वर बिजली थरथरत उभी होती....
छंद होता तिला न्यारा, पावसात भिजण्याचा....

अशी उभी मी पावसात , कुंद त्या समयी ...
वेड्या रानफुलांनी का भरावी ओंजळ माझी ...
टपटप पडले मोती काही.
टिपण्या धावले  तर झाली ओंजळ रीती...
दरवळला तो गंध चोही कडे त्या रानवेड्या फुलांचा
सोबत तोही तसाच वाहून गेला...
छंद न्यारा पावसाचा तिला एकटी करून गेला

छंद न्यारा पावसाचा तिला एकटी करून गेला

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...