एक एक आठवण ,पापण्यांच्या कडा ओल्या
जाती परतून नयनी , भावनांचा खेळ बिलोरा
अलगद जरी टपकली , खळकन येतो आवाज
काचेच्या आठवणी राहती काचेच्या पेल्यात
हळुवार पणे , नाजूक फुंकर , येतो शहारा
आठवनींचा पसारा नव्हे काचेचा खेळ सारा
हिशोब मांडते कधी मी , फुटलेल्या काचांचा
बोचते एखादी मधेच, जाणीव चुकांची होता
फुटलेल्या परी ,बोचलेल्या अधिक होत्या
नाजूक तेवढ्या बाकी खर्च व्हायच्या होत्या
नाजूक तेवढ्या खर्च व्हायच्या होत्या.........
एक थेंब तुझ्यासाठी
No comments:
Post a Comment