सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….
आणलेस का मज सांग ना , ओंजळीतून हे शिंपले
स्वप्नापरी जे रंगले , होऊन मोती किती सांडले
नकाराची तुला मी…… देवू किती कारणे ,
घे की रे समजून साजणा , मन मोहना मन मोहना .
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….
हैराण मी, व्याकूळ मी , तो स्पर्श का वाटे हवा मला
तनमनात भरलेला गंध वेडा शोधते मी दुराव्यात हि ….
नकाराची तुला मी…… देवू किती कारणे
ओढ हि मनीची संपेल कशी सांग ना , सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….
ठेवून भाळी अधर तुझे का भरलेस मळवट असे
शमली माझी क्षुधा , तृपता दाटली मनी माझ्या
नकाराची मला …सापडूच नये कारणे आता
उगा लांबलेली भेट हि घेवून मिठीत संपवना संपव आता
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… ….
एक थेंब तुझ्यासाठी
१५ ऑगस्ट २०१५
No comments:
Post a Comment