विचारांचा घोटला गळा,भावनांचा केला चक्काचूर
विचारतात उरले काय मग , मनाच्या तळाशी आता
तो विचार, ती भावना ह्यांचा बळी घेवून जन्मली कविता
तू चुंबिता ते शब्द कवीचे , झाले जिवंत सगळे पुन्हा
विचार झाले शिरजोर, भावना झाल्या अनावर पुन्हा
देवून जीवन त्यांना तू घेतलास बळी कवितेचा ,
जन्म की मृत्यू दोन्ही खेळ ना कोणाच्या हाती
मोक्ष कसा लाभावा, हीच चिंता त्या शब्दांच्या माथी
हीच चिंता त्या शब्दांच्या माथी
एक थेंब तुझ्यासाठी .
23 August 2015