Saturday, October 19, 2013

श्वास असा रोखतेस का ???



सुटून गेला हात जरी
तरी नाते कधी संपेल का
सोडून गेली वेळ तरी
आठवण कधी थांबेल का ?
विरून गेली लाट किनारी ,
गूज तिची मिटली का?
येवून गेले किती पावसाळे ,
तृष्णा कधी शमली का ?
मग आजच का अट्टाहास हा,
जाताना धरलास हात का?
गेले बोलून डोळे सारे ,
मग शब्दांची वाट पाहतेस का ?
थांब अजून पळभर सख्या ……म्हणून …
श्वास असा रोखतेस का?……

एक थेंब तुझ्यासाठी
२० ऑक्टोबर  २०१३ 

Thursday, October 17, 2013

भेटेल का ग सजण मला …

भेटेल का ग सजण मला …

पहाट अबोली, स्वप्न लोचनी ,
असे गुंफलेले , सोडले अधर,
नाद हा खुळा ,मग उगी लागला
सांग सये ……
भेटेल का ग सजण मला

ओल्या दिसाची, वाट कोवळी,
अशी कातरलेली, सोडली मिठी
गंध हा देही , मग भासे वेगळा ,
सांग सये ……
भेटेल का ग सजण मला

धुंद रातीला, कुंद प्रीतीचा
असा सुवासिक, सोडला अंबाडा,
बुडू लागला ,बघ प्राण खुळा,
सांग सये ….
भेटेल का ग सजण मला

(एक थेंब तुझ्यासाठी )
१७ ऑक्टोबर २० १ ३

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...