Sunday, July 17, 2011

तिला हल्ली त्रास होतो त्याच्या प्रेमाचा

तिला हल्ली त्रास होतो त्याच्या प्रेमाचा

अंगणाला भार होतो, प्राजक्ताच्या सड्याचा,
चांदणीला त्रास होतो, शीतल चांदण्याचा,

मोगरयाला भार होतो, आपल्याच सुगंधाचा,
नेत्रांना त्रास होतो, मिटणार्या पापण्यांचा,

स्वप्नांना भास होतो, आभास प्रतिमांचा,
रात्रीला त्रास होतो, काळोख्या प्रतिमेचा,

हृदयाला भार होतो, चुकवणाऱ्या ठोक्यांचा,
वेदनेला त्रास होतो, दुखणाऱ्या जाणीवेचा,

ओठांना भार होतो, फुलणाऱ्या हास्याचा,
खळीला त्रास होतो, गालावर फुलण्याचा,

तिला म्हणे भार होतो, हळव्या प्रेमाचा
तिला हल्ली त्रास होतो त्याच्या प्रेमाचा,

एक थेंब तुझ्यासाठी
१८ जुलै २०११

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...